Pune-Nashik-Highway 
पुणे

नाशिक रस्ता होणार मोकळा?

सकाळवृत्तसेवा

चाकण - पुणे-नाशिक महामार्गावरील अतिक्रमणे काढण्यासाठी तत्काळ पोलिस बंदोबस्त देण्यात येईल. ग्रामीण भागातील चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव आदींसह इतर प्रमुख पोलिस ठाण्यात किमान ५० पोलिस उपलब्ध करून देण्यात येतील, असे आश्वासन जिल्हा (ग्रामीण) पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी पुण्यात झालेल्या जिल्हा रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत दिले.

खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. पुणे-नाशिक महामार्गावर चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव पोलिस ठाण्यांच्या हद्दीत वाहतूक कोंडी सातत्याने होते. जिल्ह्यातील इतर मार्गावरही कोंडी असते. या पार्श्वभूमीवर आढळराव यांनी जिल्हा रस्ते सुरक्षा समितीची बैठक बोलविली होती. बैठकीत आढळराव यांनी चाकण, राजगुरुनगर, नारायणगाव, वाघोली या ठिकाणी वाहतूक कोंडीचा प्रश्न अधिक गंभीर झाल्याकडे लक्ष वेधले. अतिक्रमणे आणि अवैध वाहतुकीची वाहने पार्किंग केल्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो. याबाबत पोलिस यंत्रणा काय उपाययोजना करणार आहे, अशी विचारणा केली. याबाबत पोलिस अधीक्षक पाटील यांनी सांगितले, की नगर परिषद व मोठ्या ग्रामपंचायतीची अतिक्रमणे काढण्याबाबत मागणी येताच पोलिस बंदोबस्त देण्यात येईल. वाहतूक नियंत्रणासाठी प्रत्येक पोलिस ठाण्याला ५० पोलिस देण्यात येतील. स्वयंसेवी संस्था व नागरिकांनी परस्पर वाहतूक नियंत्रण करू नये, पोलिसांशी संपर्क साधावा. जिल्ह्यात नऊशे नवीन होमगार्डची भरती करण्यात आली आहे, त्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रशिक्षण संपल्यानंतर त्यांचा वापर वाहतूक नियंत्रित करण्यासाठी होईल. 

आढळराव पाटील म्हणाले, की पुणे-नाशिक महामार्गावर राजगुरुनगर शहर; तसेच घाटात, मंचर, नारायणगाव येथे मोठमोठे खड्डे पडले आहे. या खड्ड्यांमुळेही वाहतूक कोंडी होते. 

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालकांना हे खड्डे बुजविण्यास सांगितले आहे. भोसरी ते राजगुरुनगर या रस्त्यावर सुमारे बाराशे सहाआसनी, तीनचाकी रिक्षा, जीप आदी वाहने बेकायदा प्रवासी वाहतूक करतात. ही वाहने चौकात रस्ते अडवतात, त्यामुळे वाहतूक ठप्प होते. त्याकडे पोलिस दुर्लक्ष करतात. बेकायदा प्रवासी वाहतुकीला कोणाचे पाठबळ आहे, याची चौकशी करून त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी. 

बैठकीस खासदार अनिल शिरोळे, अमर साबळे, आमदार भीमराव तापकीर, जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, पिंपरी-चिंचवडच्या पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राम गावडे, चाकणचे नगराध्यक्ष शेखर घोगरे, उपनगराध्यक्ष प्रकाश गोरे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, इतर अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

‘चाकण-मोशीदरम्यान २० पोलिस द्या’ 
चाकण, राजगुरुनगर या नगर परिषदांना महामार्गावरील चौकातील अतिक्रमणे काढण्याची मागणी केल्याचे पत्र दिले आहे. चाकण ते मोशीदरम्यानची वाहतूक नियंत्रित करण्यासाठी किमान वीस ते बावीस पोलिस कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तांकडे केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT