पुणे

सुधारित बातमी: जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र

CD

नाशिक जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र

१०३ टँकरद्वारे ३२२ गावे-वाड्यांना पाणीपुरवठा: प्रशासनाची कसरत

ॲग्रोवन वृत्तसेवा

नाशिक : मे महिन्यात उन्हाचा चटका वाढू लागताच जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणी टंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. जिल्ह्यातील तब्बल ३२२ गावे आणि वाड्यांना सध्या १०३ खाजगी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. ११ मे २०२६ रोजीच्या अधिकृत अहवालानुसार, जिल्ह्यातील १ लाख ७० हजार १०० नागरिक सध्या टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत.
जिल्ह्यात पाणी टंचाईचा सर्वाधिक फटका येवला तालुक्याला बसला आहे. या एकाच तालुक्यात ३६ गावे आणि ४७ वाड्यांमध्ये पाण्याची भीषण टंचाई असून, तिथे सर्वाधिक ३३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. येथील ५८,४४८ नागरिकांना दररोज टँकरची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्याखालोखाल मालेगाव , इगतपुरी आणि सिन्नर या तालुक्यांमध्ये परिस्थिती चिंताजनक आहे.
जिल्ह्यातील पाणीटंचाई असणाऱ्या भागात सर्वच पाणीपुरवठा खाजगी टँकर द्वारे करण्यात येत आहे. मात्र सध्या शासनाचा कुठलाही टँकर रस्त्यावर नाही. टँकर भरण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यात एकूण ३५ विहिरींचे अधिग्रहण केले आहे. यामध्ये मालेगाव तालुक्यात सर्वाधिक १४ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. नांदगाव तालुक्यात ६, येवल्यात ४, बागलाण देवळा तालुक्यात प्रत्येकी २ तर चांदवड, देवळा आणि येवला तालुक्यात प्रत्येकी काही विहिरींचा आधार घेतला जात आहे.टंचाईग्रस्त भागात पाणी पोहोचवण्यासाठी जिल्ह्यात दररोज एकूण २११ फेऱ्या मारल्या जात आहेत. यामध्ये येवल्यात ५५ तर सिन्नर तालुक्यात सर्वाधिक ३७ फेऱ्यांची नोंद आहे. एकूण ३२२ बाधित ठिकाणांमध्ये ९७ गावे असून २२८ वाड्यांचा समावेश आहे, म्हणजेच वाड्या-पाड्यांवरील वस्त्यांना टंचाईचा अधिक सामना करावा लागत आहे.

मागील वर्षाशी तुलना:
मागील वर्षी जिल्ह्यात १४१ टँकर्स सुरू होते. यंदा ही संख्या १०३ असली तरी टंचाईग्रस्त लोकसंख्या १.७० लाखांच्या वर गेल्याने यंत्रणेवरील ताण कायम आहे. बागलाण, दिंडोरी, नाशिक त्र्यंबकेश्वर, कळवण आणि निफाड या तालुक्यांमध्ये सध्या एकाही टँकरची गरज भासलेली नाही. जिल्हा प्रशासनाकडून टंचाई निवारणासाठी उपाययोजना केल्या जात असल्या तरी, वाढत्या तापमानामुळे आगामी दिवसांत टँकरची मागणी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तालुकानिहाय स्थिती
तालुका...गावे/वाड्या...टँकर संख्या...फेऱ्या
येवला...८३....३३...५५
मालेगाव...६२...१४...२७
इगतपुरी...४२...१४...३०
सिन्नर...५४...१३...३७
चांदवड...१९...०८...१७
पेठ...०८...०५...११
सुरगाणा...०८...०४...१०
देवळा...१४...०३...६
नांदगाव...३२...९...१८
एकूण...३२२...१०३...२११

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: शुभमन गिलच्या कॅप्टन्सीबद्दल विराट कोहलीने स्पष्टच सांगितलं, 'अजूनही शिकतोय, तो दीर्घकाळ...'

NEET 2026: 'स्लो लर्नर' ते ऑल इंडिया रँक 1; सोडवले 10 हजारांपेक्षा जास्त MCQ! पाहा NEET PG टॉपरची भन्नाट यशोगाथा...

होमस्टेमध्ये २२ वर्षीय निमिषाचा मध्यरात्री मृत्यू, बॉयफ्रेंड आसिफला पोलिसांनी घेतलं ताब्यात

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात खासगी रुग्णालय आणि पॅथॉलॉजीवर कारवाई

Mumbai-Pune Accident: मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर तिहेरी अपघात; कोल्हापुरच्या दोन तरुणांचा मृत्यू, एक गंभीर Video Viral

SCROLL FOR NEXT