पुणे

नसरापूर गाव ते बनेश्वर रस्ता २० दिवस बंद

CD

नसरापूर, ता. २४ : भोर तालुक्यातील नसरापूर गाव ते बनेश्वर मंदिर रस्त्याचे काम गेले अनेक दिवस सुरूनाअहे. आता रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरू झाले आहे. या कामामुळे मंगळवार (ता. २४) पासून २० दिवस हा रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे.
बनेश्वर रस्त्याचे काम गेले अनेक दिवस सुरू असून रुंदीकरण करून मजबुतीकरण करण्यात येत आहे तसेच बाजूच्या जुन्या संरक्षक भिंत पाडून नव्याने बांधण्यात येत आहेत. रस्त्याच्या चाललेल्या या कामाच्या एकाबाजूने वातूक सोडली जात होती; मात्र मंगळवार पासून काँक्रिटीकरण सुरू झाल्याने वाहतुकीसाठी पूर्ण रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. या दरम्यान बनेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी वाहनधारकांना जानकीराम मंगलकार्याला जवळ वाहन थांबवून चालत जावे लागणार आहे. तसेच बनेश्वर मार्गे केळवडे गावाकडे जाणाऱ्या वाहनांना नसरापूर-चेलाडी माहामार्गावरून केळवडे गावाकडे जावे लागणार आहे. मंदिराकडून गावामध्ये येण्यासाठी देखिल वाहनांचा वापर करता येणार नाही याची दक्षता घेऊन भाविकांनी तसेच परिसरातील नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.

"कामाचा दर्जा उत्कृष्ट ठेवा''
बनेश्वर रस्त्याचे काम सुरू झाल्यापासून ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी अनेकवेळा अक्षेप घेत काम अंदाजपत्रकाप्रमाणे व्हावे अशी मागणी केली होती यावेळी पीएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कामास भेट देऊन ठेकेदाराला योग्य त्या सूचना दिल्या आहेत. आता होत असलेल्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामाचा दर्जा देखिल चांगला ठेवावा अशी मागणी सरपंच उषा कदम, माजी उपसरपंच नामदेव चव्हाण, संदीप कदम यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

kolhapur Danoli killing case : दानोळी २५ लाखांच्या अपहरण करून खून प्रकरणाला नवे वळण; एकावर डोळा, दुसऱ्यावर गेम, गुप्तांगाला दिला विजेचा शॉक

Pune Airport: पुणे विमानतळ धावपट्टीचे काम पावसाळ्यानंतरच; उन्हाळी हंगामामुळे दुरुस्ती लांबणीवर, ‘नोटम’ कालावधीत काम होणार!

जातीचा दाखला कैसा बनाया? सहर शेख अडचणीत, ४ कार्यालयांना फसवलं; नगरसेवकपद धोक्यात

Nirav Modi Extradition Update : नीरव मोदीला भारतात आणलं जाणार? CBIची टीम लंडनमध्ये

IPL 2026: मुंबई इंडियन्सचं टेन्शन आणखी वाढणार... रोहित शर्मा MI vs PBKS मॅच खेळणार की नाही? जाणून घ्या काय आहे अपडेट

SCROLL FOR NEXT