पुणे

आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर मोहरीतील रस्त्याची दुरुस्ती

CD

नसरापूर, ता. २० : मोहरी खुर्द (ता. भोर) येथे ठेकेदाराने केलेले सिमेंट काँक्रीटचे निकृष्ट काम जिल्हा परिषद सदस्य विक्रम खुटवड यांच्या इशाऱ्यानंतर तातडीने दुरुस्त करण्यात आले. संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याच्या मागणीसह आंदोलनाचा इशारा खुटवड यांनी दिला होता.
जिल्हा नियोजन समितीच्या जनसुविधा निधीतून मे २०२४मध्ये या रस्त्याचे काम झाले होते. मात्र, ठेकेदार अमित जामदार यांनी केलेल्या निकृष्ट कामामुळे रस्त्याला मधोमध मोठी चीर पडली होती. ग्रामस्थांनी तक्रार केल्यानंतर खुटवड यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून निकृष्ट झालेले काम ठेकेदार, उप अभियंता विकास कुलकर्णी, कनिष्ठ अभियंता शेख आणि ग्रामसेवक यांच्या निदर्शनास ग्रामस्थांनी आणून देखील त्यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही. याबद्दल त्यांच्यावरही कारवाईची मागणी केली होती.
या पत्राची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणेला तातडीने दुरुस्तीचे आदेश दिले. त्यानुसार खराब झालेला रस्ता पुन्हा नव्याने तयार करण्यात आला आहे. लोकप्रतिनिधींच्या तत्परतेमुळे रस्त्याचा प्रश्न सुटल्याने मोहरी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुरुंगातून सुटल्यानंतर संतोष पंडित यांचा पहिला व्हिडीओ, रस्त्यात खड्ड्याला घातला हार; पाहा video

IND vs JPN: ३२ धावा करूनही भारताने जपानला हरवलं! २ धावांच्या थरारक विजयासह टीम इंडियाने रचला असा वर्ल्ड रेकॉर्ड, जो आजपर्यंत कुणालाच जमला नाही

PPF की NPS? दरमहा 5000 रुपयांच्या गुंतवणुकीतून उभे राहतील दीड कोटी रुपये; जाणून घ्या संपूर्ण गणित

Marathi News Live Updates: पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस

साहील मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! परीक्षेदरम्यान प्राध्यापकांनी बाजूला नेलं अन्..., CCTV फुटेज समोर, 15 मिनिटांत काय घडलं?

SCROLL FOR NEXT