पुणे

कापूरव्होळ अपहरणप्रकरणी तिघांना कोठडी

CD

नसरापूर, ता. ५ : कापूरव्होळ (ता. भोर) येथील उद्योजक लखनशेठ दळवी यांच्या मुलाच्या अपहरणप्रकरणी राजगड पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
अक्षय लक्ष्मण इंगुळकर (वय ३०, रा. मुंढवा, केशवनगर, पुणे), अक्षय दत्तात्रेय भालेराव (वय ३०, रा. हडपसर, पुणे), अथर्व सचिन इंगुळकर (वय २०, रा. कामथडी ता. भोर) असे कोठडी सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत. मंगळवारी (ता. ३) दुपारी दीडच्या सुमारास अपहरण करून पळून चाललेल्या अपहरणकर्त्यांच्या मोटारीला पोलिस व ग्रामस्थांनी जेऊर येथून पिसुर्टी (ता. पुरंदर) जाणाऱ्या रस्त्यावर ताब्यात घेतली. यावेळी अपहरणकर्ते मोटार व मुलाला सोडून पळाले होते. मुलाला सुरक्षित कुटुंबाकडे सोपवल्यावर पोलिसांच्या वतीने आरोपींची शोध मोहीम राबवली गेली. यामध्ये रात्रीच तीन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले. या गुन्ह्यात एकूण सहा आरोपी असून उर्वरित तिघांचा शोध सुरू आहे. अटक केलेल्या आरोपींकडून गुन्ह्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. राजगडचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथक पुढील तपास करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: मुंबई-ठाणे-कल्याण प्रवास सुसाट होणार! खाली रस्ता, मध्यभागी उड्डाणपूल आणि वर मेट्रो धावणार, जाणून घ्या संपूर्ण प्लॅन

T20 WC, IND vs ENG SF: भारत-इंग्लंड सामन्यासाठी वानखेडेवरील '७' नंबरची खेळपट्टी वापरली जाणार; २४ तासांत फिरला गेम... स्टेडियमवरून ताजे अपडेट्स

Latest Marathi News Live Update : एसटी चालक आणि वाहकांची अल्कोहोल तपासणी बंधनकारक

Kolhapur Wrestling : कोल्हापूरच्या मातीचा गाजणार पुन्हा एकदा जलवा; कुंभी कारखान्याच्या कुस्ती स्पर्धेत ५०० हून अधिक पैलवान उतरणार आखाड्यात

Beed News : गांजा तस्करीचे मोठे रॅकेट उघड? बर्दापूर पोलिसांची मोठी कामगिरी; मूर्ती फाट्याजवळ १० लाख ८०० रुपयांचा मुद्देमाल पकडला, तिघांना बेड्या

SCROLL FOR NEXT