Nasrapur Fire Accident Sakal
पुणे

Nasrapur Fire Accident : शिवापूर-रांझे येथील दोन कंपन्यांना आग; लाखो रुपयांचे नुकसान

शिवापूर- कोंढणपूर रस्त्यावरील औद्योगिक पट्ट्यातील शेजारी शेजारच्या दोन कंपन्यांना आज ता. 27 रोजी सकाळी अचानक आग लागली यामध्ये सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र कंपन्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

किरण भदे

नसरापूर : शिवापूर- कोंढणपूर रस्त्यावरील औद्योगिक पट्ट्यातील शेजारी शेजारच्या दोन कंपन्यांना आज ता. 27 रोजी सकाळी अचानक आग लागली यामध्ये सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र कंपन्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

तालुक्यातील रांझे येथील "टफ कोट पॉलिमर्स प्रायव्हेट लिमिटेड" कंपनीला बुधवारी (दि. २७ मार्च) सकाळी १०:१५ च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये कंपनीतील लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे.

या कंपनीमध्ये २७ कामगार काम करत असताना अचानक पेंटच्या बॅलरला आग लागली. काही क्षणातच या आगीने अचानक भीषण रूप धारण केले. या कंपनीच्या बाजूला असणारी कंपनी "एस्कोपेंट प्रायव्हेट लिमिटेड" या कंपनीला देखील आग लागली.

स्थानिकांनी पोलीस स्टेशन आणि डायल ११२ यांना या घटनेची माहिती दिली. राजगड पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन भोर फायर स्टेशन, कात्रज फायर स्टेशन आणि नांदेड सिटी (pmrd) या फायर स्टेशनला माहिती दिली. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले.

कंपनी मध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल असल्या कारणाने आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट पसरले होते. सदर आगीच्या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. परंतु या आगीमध्ये कंपनीमधील लाखो रुपयांच्या साहित्यांचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणी राजगड पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja First Look 2026 : प्रतीक्षा संपली! लालबागच्या राजाचा पहिला लूक समोर; बाप्पाचं मनमोहक रूप पाहून भाविकही भारावले, पाहा खास फोटो

BRICS Summit 2026 : पीएम मोदींनी पुतिन यांना भेट दिलेला 'तिरुक्कुरल' ग्रंथ काय आहे? जाणून घ्या संत तिरुवल्लुवर यांचा इतिहास

VIRAT KOHLI :लंडनमध्ये विराट कोहली अन् एकनाथ शिंदेंची खास भेट; विकासकामांपासून युवा टॅलेंटपर्यंत झाली चर्चा, नेमकं काय बोलणं झालं?

BRICS Summit Food: सत्तू, मखाना अन् काश्मिरी पदार्थ... ब्रिक्स परिषदेतले शाही मेन्यू कोणते? नॉनव्हेज आहे का?

Latest Marathi News Live Update : शिंदेसेनेच्या आमदाराच्या मुलाला अटक, कारण काय?

SCROLL FOR NEXT