पुणे

यवत पोलिसांकडून केबल चोरट्याला अटक

CD

खुटबाव, ता. २४ : नाथाचीवाडी (ता. दौंड) येथील विद्युत पंपाच्या तांब्याचे केबल चोरी करणाऱ्या परप्रांतीय युवकाला यवत पोलिसांनी अटक केली आहे. या चोरट्याकडून पोलिसांनी १ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
यासंदर्भात सविस्तर हकीगत अशी की, दिनांक ८ व ९ ऑगस्ट रोजी माटोबा तलाव नाथाचीवाडी येथील २० विद्युत पंपांच्या तारा चोरीला गेल्याच्या घटना घडल्या. या संदर्भात यवत पोलिस ठाण्यामध्ये वेगवेगळे तीन गुन्हे दाखल झाले. खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनंतर यवत पोलिसांनी शोध घेतला. त्यामध्ये सदर केबल चोरी ही परप्रांतीय मजूर मनोज गुलाब बिंद ( वय ३७, रा. मांजरी फार्म, ता. हवेली) याने चोरल्याचे‌ निष्पन्न झाले. आरोपीकडून यवत पोलिसांनी १ लाख १५ हजार रुपये किमतीच्या कृषी पंपांच्या तांब्याच्या केबल व दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati Hospital Fire : निधी नव्हता म्हणून फायर ऑडिटला विलंब, अमरावतीतील रुग्णालयाबाबत धक्कादायक माहिती समोर

Pune Crime: पुण्यात कौटुंबिक वादातून गोळीबार; कसबा पेठेत ३० वर्षीय पती जखमी, घटनास्थळी शस्त्र सापडले

Loan Waiver: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी; खात्यात पोहोचले हजारो कोटी

Hospital Fire: अमरावतीतील नवजात बालकांच्या मृत्यूने भंडाऱ्याची ‘ती’ काळरात्र पुन्हा ताजी; २०२१ मध्ये १० बालकांचा आगीत मृत्यू

आनंदाची बातमी! पुण्यात १३ लाखांत मिळणार घर, म्हाडाकडून ४४६२ घरांसाठी लॉटरी जाहीर

SCROLL FOR NEXT