पुणे

वाई:-कवठे येथील ‘समृद्धी’ एफपीओला एनसीडीसीचा राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार देशपातळीवर प्रथम; महाराष्ट्राच्या सहकार चळवळीचा नावलौकिक

CD

कवठे शेतकरी कंपनीला राष्ट्रीय पुरस्कार

वाई शहर, ता. २ : कवठे (ता. वाई) येथील समृद्धी शेतकरी उत्पादक सहकारी संस्थेला राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाकडून प्रादेशिक सहकारी उत्कृष्टता पुरस्कार प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे, या श्रेणीत प्रथम क्रमांक पटकावत संस्थेने देशपातळीवर महाराष्ट्राच्या सहकार चळवळीचा मान उंचावला आहे.
एनसीडीसीमार्फत दर दोन वर्षांनी दिला जाणारा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार पुणे येथे झालेल्या समारंभात प्रदान करण्यात आला. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण डेरे, अध्यक्ष विकास डेरे व उपाध्यक्ष रत्नमाला डेरे यांनी पुरस्कार स्वीकारला. शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविण्यात आलेले वैविध्यपूर्ण प्रकल्प, व्यावसायिक पारदर्शकता तसेच उच्च दर्जाचे व्यवस्थापन यांची दखल घेत हा सन्मान देण्यात आला आहे. राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळणे ही संस्थेच्या सभासद व शेतकऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांची पावती आहे, असे मत सीईओ भूषण डेरे यांनी व्यक्त केले. या उल्लेखनीय यशामुळे समृद्धी एफपीओचे नाव राष्ट्रीय स्तरावर अग्रक्रमाने घेतले जात असून, जिल्हाभरातून संस्थेचे अभिनंदन होत आहे.
--------
07544
पुणे : पुरस्कार स्वीकारताना भूषण डेरे, विकास डेरे आणि रत्नमाला डेरे व सभासद.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT