National Bravery Award to dnyey Kulkarni for saving life of four-year-old boy pune
National Bravery Award to dnyey Kulkarni for saving life of four-year-old boy pune sakal
पुणे

Pune News : ज्ञेय कुलकर्णीला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार

अक्षता पवार - सकाळ वृत्तसेवा

पुणे : धाडसाला वयाची मर्यादा नसते हे सिद्ध केले ते पुण्यातील संस्कृती स्कूल भुकूम कॅम्पस शाळेतील ९ वर्षांच्या ज्ञेय कुलकर्णी याने. चार वर्षाच्या मुलाचे प्राण वाचवून त्याने शौर्याची कामगिरी केली आहे. यासाठी त्याला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे.

बावधन येथे राहणारा ज्ञेय सध्या चौथीत शिकत आहे. त्याने ४ वर्षांच्या लहान मुलाचे प्राण वाचवून समाजासमोर एक आदर्श उभा केला आहे. बिबवेवाडी परिसरातील पर्पल कॅसल सोसायटीमध्ये एक चार वर्षांचा मुलगा आपल्या बहिणीसोबत खेळत होता.

ते दोघे ही सीसॉवर खेळत होते. दरम्यान सीसॉजवळ असलेल्या इलेक्‍ट्रिकच्या खांबातील वीजप्रवाह त्या सीसॉमध्ये झाल्यामुळे हा मुलगा त्याला चिकटला. त्या मुलाची बहिण मदतीसाठी आरडाओरडा करत असताना तेथून जात असलेल्या ज्ञेयने प्रसंगावधान राखून त्या मुलाला धक्का देत सीसॉवरून खाली पाडले.

त्यामुळे विजेच्या झटक्यातून तो बचावला. या कामगिरीसाठी ज्ञेयला हा पुरस्कार दिला जात आहे. या शूर कामगिरीसाठी ज्ञेयला कौतुकाची थाप मिळत असून इतरांना देखील त्याच्या या कृतीतून प्रेरणा मिळत आहे. दरम्यान हा राष्ट्रीय पुरस्कार २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे दिले जाणार आहे. हा कार्यक्रम राष्ट्रपती, पंतप्रधान आदींच्या उपस्थित पार पडेल.

याबाबत ज्ञेयने सांगितले, ‘‘आई आणि आजी मला नेहमी दुसऱ्यांना मदत करण्याचे सांगतात, त्यामुळे मदत करायला आवडते. जेव्हा हा प्रसंग घडला तेव्हा मी पायात रबरचे स्लीपर घातले होते. त्यामुळे मला विजेचा झटका बसणार नाही हे ही आई व आजीने शिकविले होते म्हणून माहिती होते.

म्हणून मी धावत त्या मुलाकडे गेलो. त्या मुलाचे प्राण वाचवून मला ही आनंद झाला. यासाठी शाळेत सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, मित्र-मैत्रिणी सगळेच माझे कौतुक करत असल्याने मला अभिमान वाटतो. मदतीचे कार्य असेच सुरू रहावे यासाठी प्रशासकीय सेवेतील अधिकारी म्हणून काम करण्याची इच्छा आहे.’’

राष्ट्रीय शौर्य पुरस्काराबाबत

कोणतेही कठीण प्रसंग असो किंवा घटनांमध्ये लहान वयातच शूर कामगिरी करणाऱ्या देशातील १६ वर्षाखालील सुमारे २५ मुलांना दरवर्षी ‘राष्ट्रीय शौर्य पुरस्कारा’ने गौरविण्यात येते. हा पुरस्कार प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी २५ जानेवारीला दिला जातो.

भारत सरकार आणि भारतीय बालकल्याण परिषदेद्वारे (आयसीसीडब्ल्यू) हा पुरस्कार दिला जात असून १९५७ सालापासून या पुरस्काराला सुरवात झाली. पदक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असा या पुरस्काराचा स्वरूप आहे.

‘‘ज्ञेयच्या बाबांचा अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे त्याची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर आहे. आपल्या मुलाने इतकी मोठी कामगिरी केल्यावर आई म्हणून मला त्याचा खूप अभिमान वाटतो. त्याच्या धाडसामुळे एका लहान मुलाचे प्राण वाचू शकले. इतक्या लहान वयात असलेली समझदारी, धाडस खरच कौतुकास्पद आहे. तो एक चांगला व्यक्ती म्हणून घडत असल्यामुळे आता त्याच्या भविष्याची चिंता नाही.’’

- ॲड. नंदिनी कुलकर्णी, ज्ञेयची आई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT