पुणे

राष्ट्रीय परिषदेला प्रतिसाद

CD

वडगाव मावळ, ता.१६ : श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यापक महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद पार पडली. प्रा. डॉ. अनिता धायगुडे यांनी परिषदेचे प्रास्ताविक केले. या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष तुकाराम असवले, अशोक बाफना, संचालक मंडळ उपस्थित होते. परिषदेचे पहिले बीजभाषण सीएमआर युनिव्हर्सिटी बंगलोर येथील डॉ. बालाजी बी.आर. यांचे झाले. डॉ. संजय तांबट यांनी प्रादेशिक भाषेचे महत्त्व व मातृभाषेतून शिक्षण भावी पिढीच्या प्रगतीसाठी किती महत्त्वाचे आहे, याबाबत मत मांडले. डॉ. सुरेंद्र हेरकळ यांनी विकसित भारत २०४७ यानुसार भारताला २०४७ पर्यंत पोहोचण्यासाठी काय करणे अपेक्षित आहे, याबाबत मार्गदर्शन केले. या सत्राचे सूत्रसंचालन डॉ. शीतल देवळालकर यांनी केले. आभार डॉ. दिपा नेवसे यांनी मानले.
दुपारच्या सत्रात २५ विद्यार्थ्यांनी संशोधन पेपरचे वाचन केले.
दुसऱ्या दिवशी प्राचार्य डॉ. निलू घोष यांनी ‘न्यूरोसायन्स इन एज्युकेशन फॉर सस्टनेबल डेव्हलपमेंट’ या विषयाची मांडणी केली. डॉ. नेहा देव यांनी विकसित भारत २०४७ साठी विविध योजना व त्याबाबत मार्गदर्शन केले. ज्योती रणदिवे यांनी प्रास्ताविक केले तर डॉ. अनामिका कावरे यांनी आभार मानले.
परिषदेच्या समारोपास डॉ. अनिता बेलापूरकर व डॉ. मोहन कांबळे उपस्थित होते. परिषदेच्या समन्वयक डॉ. कविता तोटे यांनी परिषदेच्या कार्याचा आढावा घेतला. उत्तम पेपर सादरीकरण केलेल्या दोन संशोधक विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थिनी ऊर्मिला करपे, पीएचडी संशोधक विद्यार्थी निकिता कांबळे, सतीश उपलाविकर यानी परिषदेबाबत मत मांडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Konkan Project : पोयनार, न्यू मांडवे धरणांना मान्यता; मंत्री कदम, पोयनारला २६५, न्यू मांडवेला १९५ कोटी

Nashik Municipal Corporation : नाशिकच्या २४ खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार! महापालिका अंदाजपत्रकात 'खेडे विकास निधी'ची तरतूद

'यापेक्षा पॉर्न बरं असतं' नोरा फतेहीच्या गाण्यावर भडकले नेटकरी, म्हणाले...'शब्द असे की...'

"काहीही झालं तरीही व्यायाम चुकवत नाही" कमळीच्या 68 वर्षांच्या आजीचं थक्क करणारं फिटनेस रुटीन

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्हा परिषदेत अध्यक्ष-उपाध्यक्ष पदांची बिनविरोध निवड

SCROLL FOR NEXT