National Curriculum Framework for school education 
पुणे

राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यासाठी नोंदवा तुमचेही मत..!!

शिक्षण भविष्यवेधी होण्यासाठी काय करायला हवे, अशा प्रश्नांवर तुम्हीही तुमचे मत

मीनाक्षी गुरव

पुणे : इयत्ता पहिलीपासून शाळेत विद्यार्थ्यांना कोणत्या भाषा शिकवायला पाहिजेत, तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना कोणते विषय शिकवावेत, शिक्षण भविष्यवेधी होण्यासाठी काय करायला हवे, अशा प्रश्नांवर तुम्हीही तुमचे मत मांडू शकता आणि त्याद्वारे ‘राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा’ विकसित करण्यासाठी तुमच्या सूचना देऊ शकता.

आश्चर्य वाटतंय ना! अहो, पण हे खरे आहे. ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’च्या प्रयत्न अंमलबजावणीसाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत (एनसीईआरटी) ‘राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा’ निर्मितीसाठी सर्वेक्षणाद्वारे देशभरातील नागरिकांच्या सूचना आणि अभिप्राय मागविण्यात आले आहेत. या सर्वेक्षणात विशेषत: शालेय शिक्षणात कोणते बदल करणे अपेक्षित आहेत, यावर दहा प्रश्न विचारण्यात आले आहेत. त्याला बहुपर्यायी दिली उत्तरे असून, त्या प्रत्येकाला पाच पर्याय दिले आहेत.

शालेय शिक्षणातून मुलांनी कोणती मूल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे?, शालेय शिक्षणाकडून समाजाच्या कोणत्या अपेक्षा आहेत?, इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गांसाठी विद्यार्थ्यांनी कोणती विषयनिहाय क्षेत्र अभ्यासणे आवश्यक आहेत?, देशातील शिक्षकांचा सन्मान वाढविण्यासाठी आपण काय करण्याची गरज आहे?, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात शिक्षकांची भूमिका काय असावी?, असे प्रश्न ‘एनसीईआरटी’ने शालेय शिक्षणातील अभ्यासक्रम विकसित करण्यासाठी डिजिटल सर्वेक्षणात विचारले आहेत. या सर्वेक्षणातून देशभरातील नागरिकांकडून सूचना आणि अभिप्राय गोळा करण्यात येत आहेत. यामध्ये मातृभाषेतून शिक्षण, व्यावसायिक शिक्षणाला चालना, आरोग्य व योगासने, कला व संस्कृती, पर्यावरण जागरूकता, संवादकौशल्य, सामाजिक बांधिलकी यावर भर देण्यात आला आहे.

तुम्हीही असे सहभागी व्हा!

- या डिजिटल सर्वेक्षणाद्वारे तुम्हालाही तुमचे अभिप्राय कळवायचे असतील, तर ‘https://ncfsurvey.ncert.gov.in/’ या संकेतस्थळाला भेट द्या.

नवीन शैक्षणिक धोरणानुसार ‘राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा’ विकसित करताना सर्वसामान्य नागरिकांची मते जाणून घेणे, हे निश्चितच चांगले आहे. यात देशभरातील नागरिकांचा भरपूर प्रतिसाद मिळेल. अभ्यासक्रम निश्चित करताना तज्ज्ञांना या सर्वेक्षणातील निष्कर्ष नक्कीच पूरक ठरणार आहेत. तसेच हा अभ्यासक्रम आराखडा तयार केल्यानंतर तो सूचना मांडण्यासाठी उपलब्ध करून दिल्यास, त्यावर अधिक चांगल्याप्रकारे मते मांडली जातील.

- डॉ. वसंत काळपांडे, माजी शिक्षण संचालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

Dhule Crime : दारूच्या नशेत पत्नीवर प्राणघातक हल्ला, धुळे कोर्टाने सुनावली ५ वर्षांची शिक्षा

SCROLL FOR NEXT