राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत ३० संघांचा सहभाग
पुणे, ता. १० ः हॉकी महाराष्ट्रच्या वतीने आयोजित १६व्या हॉकी इंडिया कनिष्ठ मुलींच्या गटाच्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेस येत्या बुधवारपासून (ता. १२) प्रारंभ होत आहे. यांत एकूण ३० संघ भाग घेत आहेत.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या (पीसीएमसी) सहकार्याने नेहरूनगर-पिंपरी येथील मेजर ध्यानचंद हॉकी मैदानावर २३ ऑगस्ट या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेतील सहभागी तीस संघांची तीन गटांत विभागणी करण्यात आली आहे. ‘अ विभागात बारा संघांची चार गटांत विभागणी करण्यात आली आहे. यांत पूल ‘अ’ विभागात झारखंड, पंजाब, चंडीगड ‘पूल ‘ब’ मध्ये हरियाणा, ओडिशा, बंगाल यांचा, ‘पूल ‘क’ मध्ये यजमान महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, मणिपूर संघांचा, तर ‘पूल ‘ड’ मध्ये छ्त्तीसगड, मध्य प्रदेश आणि हिमाचल या संघांचा समावेश आहे. ‘बी डिव्हिजन’मध्ये दहा, तर ‘सी डिव्हिजन’मध्ये आठ संघांचा समावेश असणार आहे,
प्रत्येक गटामधील अव्वल दोन संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी (२० ऑगस्ट) पात्र ठरतील आणि त्यानंतर २१ ऑगस्टला उपांत्य फेरीच सामने, तर तिसऱ्या स्थानासाठीचा आणि अंतिम सामना २३ ऑगस्ट रोजी होणार आहे. मेजर ध्यानचंद हॉकी मैदानावर होणारी ही तिसरी राष्ट्रीय स्पर्धा आहे.
अशी माहिती अतिरिक्त पोलिस महासंचालक आणि ‘हॉकी महाराष्ट्र’चे अध्यक्ष कृष्ण प्रकाश आणि स्पर्धेचे आयोजन सचिव मनोज भोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
--------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.