पुणे

भाकप मेळावा

CD

फोटो 55867

जनविरोधी धोरणांमुळे
सामान्यांचे जगणे धोक्यात

डी राजा : ‘भाकप’तर्फे १ सप्टेंबरला दिल्लीत राष्ट्रीय रॅली

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ : ‘‘जनविरोधी धोरणांमुळे महागाई वाढली आहे. सामान्यांचे जगणे धोक्यात आले आहे. राज्यघटना, धर्मनिरपेक्षता, लोकशाही आणि सामाजिक न्यायाचे संरक्षण करा, यासह विविध मागण्यांसाठी १ सप्टेंबरला दिल्ली येथे ऐतिहासिक राष्ट्रीय रॅली होणार आहे. दिल्लीच्या रामलीला मैदानावर ‘बदलाव जरूरी है’ असा नारा देण्यात येणार आहे. यात देशभरातील कष्टकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,’’ असे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव डी राजा यांनी आज येथे केले.

भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते भालचंद्र कानगो, राज्य सचिव सुभाष डांगे प्रमुख उपस्थित होते. डी. राजा म्हणाले, ‘देश आज गंभीर आर्थिक, सामाजिक, राजकीय संकटांतून जात आहे. मोदी सरकारच्या बेजबाबदार धोरणांचा हा फटका आहे. बेरोजगारीमुळे तरुण वर्ग अस्वस्थ आहे. शेतकरी संकटात आहे. कामगारांचे हक्क हिरावले आहेत. सार्वजनिक शिक्षण, आरोग्य, वीज, पाणी, रेल्वे, बॅंकांचे खासगीकरण करण्यावर भर देण्यात येत आहे. दुसरीकडे धनिक वर्गाचे धन वाढत आहे. सामान्य व्यक्तींच्या जगण्याचे प्रश्न गंभीर बनले आहेत. मोदी सरकार विकासाची तसेच जगातील तिसरी मोठी आर्थिक व्यवस्था बनण्याची भाषा करीत आहे. सरकारचा विकास हा सामान्यांच्या लाभासाठी नाही, तर तो ठराविक धनिकांच्या लाभाचा विकास आहे. संवैधानिक संस्थांच्या स्वायत्ततेवर सरकार गदा आणत आहे. याच्या विरोधात आवाज उठवण्यासोबत विविध मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने दिल्लीत राष्ट्रीय रॅली काढण्याचे नियोजन केले आहे.’
कांगो म्हणाले, ‘मोदी सरकार सामान्य जनतेच्या जगण्याशी निगडीत प्रश्नावर मौन पाळत आहे. पंतप्रधान मोदी पत्रकार परिषद घेत नाहीत, धोरणात्मक उणिवांवर भाष्य केले, तर सरकारला ते आवडत नाही, अशा स्थितीत सरकारला प्रश्न विचारावे लागतील. सामान्यांचे जगणे सुलभ करणारी धोरणे सरकारने राबवण्यासाठी आग्रह धरावा लागेल, त्यासाठी ही रॅली आहे.’’
--------------
‘बदलाव जरूरी है’चा संदेश
दिल्लीत होणाऱ्या राष्टीय रॅलीतून ‘बदलाव जरूरी है’ असा संदेश दिला जाणार आहे. हे सरकार बदलण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचा निर्धारही व्यक्त होणार आहे. त्यासाठी प्रत्येक घराघरांतून एक सदस्य दिल्लीला यावा, यासाठी गावोगावी जागृती करण्यात येत आहे. १५ ऑगस्टपर्यंत गावागावांत ही जागृती रॅली काढण्यात येणार आहे. याचाच भाग म्हणून आज बिंदू चौकातून रॅली काढण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतावर शंभर टक्के टॅरिफ लावण्याच्या प्रस्तावाला अमेरिकन सीनेटर्सचा तीव्र विरोध; म्हणाले, ''पायावर धोंडा मारुन घेण्यासारखे...''

Uttar Pradesh: उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी काँग्रेसचा प्लॅन B! अखिलेश यादव यांच्याशी चर्चेनंतर आघाडी होणार का?

Creta Car Accident : क्रेटा कार विहिरीत कोसळली; दोघांना बाहेर काढण्यात यश तर काहींचा शोध सुरु, पद्मावती गावाजवळील घटना

Milk Rate Increase : दूध दरात दोन रुपयांची वाढ; दुग्धजन्य पदार्थही १० टक्क्यांपर्यंत महागणार

Pune News : झाडणकामावरून कर्मचाऱ्यांची झाडाझडती; कामात सहकार्य करण्याची तंबी

SCROLL FOR NEXT