बारामती, ता. ६ : तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभागाच्या वतीने ‘नॅशनल सिक्युरिटी इन द डिजिटल एज : आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर, स्पेस अँड हायब्रीड वॉरफेअर’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन नुकतेच केले गेले. यामध्ये डिजिटल युगातील राष्ट्रीय सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, अंतराळ सुरक्षा आणि हायब्रीड युद्धतंत्र या विषयांवर देश-विदेशातील तज्ज्ञांनी विचारमंथन केले.
या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी नेदरलॅंडमधील डॉ. जिन इवीस एन्झाना, कॅमेरूनमधील डॉ. अब्राहम मिन्को, प्राचार्य डॉ. अविनाश जगताप उपस्थित होते. डॉ. देविदास भोसले यांनी परिषदेची उद्दिष्टे मांडली. तीन सत्रांमध्ये विविध विषयांवर शोधनिबंध सादरीकरण आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन झाले. डॉ. जिन इवीस एन्झाना यांनी भविष्यातील सुरक्षेच्या आव्हानांसाठी संशोधन, नवोपक्रम, तांत्रिक क्षमता व आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज व्यक्त केली. डॉ. अब्राहम मिन्को यांनी नॉन-स्टेट ॲक्टर्सकडून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संभाव्य गैरवापराबाबत आफ्रिकेचा संदर्भ देत राष्ट्रीय सुरक्षेच्या आव्हानांकडे लक्ष वेधले. परिषदेच्या समारोप प्रसंगी राष्ट्रीय रक्षा विद्यापीठाचे मोहम्मद युसफ हे प्रमुख पाहुणे, तर उपप्राचार्य प्रा. डॉ. सचिन गाडेकर अध्यक्षस्थानी होते. दिल्लीचे अजय कुमार यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.