supriya sule ncp esakal
पुणे

Supriya Sule: "पक्ष आणि चिन्ह तात्पुरते.. ‘राष्ट्रवादी’ पूर्णपणे त्यांचा झालेला नाही", सुप्रिया सुळे यांनी केले सुतोवाच

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या रौप्य महोत्सवी वर्धापनदिनानिमित्त शहर कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

CD

पुणे, ता. १० : ‘‘राष्ट्रवादी हा पक्ष कोणाचा आहे, हा वाद सध्या न्यायालयात सुरू आहे. अजित पवार यांना पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले असले, तरी सर्वोच्च न्यायालयाने ते तात्पुरते असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष अद्यापही पूर्णपणे त्यांचा झालेला नाही’’, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाला महाराष्ट्रात मिळालेले यश पाहता पुन्हा राष्ट्रवादीचे घड्याळ हे चिन्ह घेणे तुम्हाला परवडणार का? या प्रश्नावर सुळे यांनी ‘‘काही गोष्टी स्ट्रॅटेजिक असतात. त्यामुळे काही गोष्टी पोटात ठेवणेच योग्य असून पोटातले ओठावर येणार नाही याची काळजी घ्यावी लागते’’, असे त्या म्हणाल्या.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या रौप्य महोत्सवी वर्धापनदिनानिमित्त शहर कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी सुळे यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला. विविध मुद्यांना सुळे यांनी हात घातला. ‘‘संविधानानेच देश चालेल हे देशातील जनतेने दाखवून दिले आहे. ‘पन्नास खोके इज नॅाट ओके’ हे जनतेने सांगितले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाने जबाबदारी वाढली आहे. पुण्याला मंत्रिपद मिळाले त्यात मला आनंद आहे, पण त्याचा फायदा कंत्राटदारांना न होता पुणेकरांना व्हावा ही अपेक्षा आहे’’, असा टोला खासदार सुळे यांनी लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK Final: भारत-पाकिस्तान 'सुवर्ण' लढत! श्रीलंकेला लोळवून श्रेयस अय्यरचा संघ फायनलमध्ये; केव्हा होणार हा महामुकाबला?

पत्ता बदलण्यासाठी Form 8 भरला अन् कुटुंबातील सहा सदस्यांची नावेच गायब; SIR प्रक्रियेवर मुंबई हायकोर्टाचा सवाल, कायदा पाळण्याची तंबी

Wicknell Chivayo Death : झिम्बाब्वेत हेलिकॉप्टरचा भीषण अपघात; जगप्रसिद्ध उद्योगपती विकनेल चिवायोसह सहा जणांचा मृत्यू

Jio ची मोठी ऑफर! 6 महिन्यांचा रिचार्ज आणि 14GB डेटा मिळणार फ्री; 'या' युझर्सना होणार फायदा...

Latest Marathi News Live Update : MPSC विद्यार्थ्यांचं 2 ऑक्टोबरचं आंदोलन स्थगित; मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT