पुणे

ऐकावे ते नवलच क्विझ! कोणत्या देशाला कौतुकाने ‘पृथ्वीवरील आठवा खंड’ असे म्हणतात?

दोस्तांनो, ‘नवल’ या शब्दाचा साधा अर्थ आहे ‘काही तरी वेगळे’! एखादी गोष्ट पाहिल्यावर आपल्या आश्‍चर्य वाटते, अचंबा वाटतो, जणू चमत्कार घडतोय असे वाटते, तेव्हा आपण म्हणतो ‘काय नवल आहे!’

CD

‘नवल’ज्ञानाची कसोटी - दोस्तांनो, ‘नवल’ या शब्दाचा साधा अर्थ आहे ‘काही तरी वेगळे’! एखादी गोष्ट पाहिल्यावर आपल्या आश्‍चर्य वाटते, अचंबा वाटतो, जणू चमत्कार घडतोय असे वाटते, तेव्हा आपण म्हणतो ‘काय नवल आहे!’
आजवर आपण ‘ऐकावे ते नवलच’ या सदरात अशा अनेक नैसर्गिक व मानवनिर्मित ‘नवलां’विषयी जाणून घेतले. आज त्या सामान्यज्ञानाची छोटीशी परीक्षा घेऊया. पाहा बरं, तुम्हाला खालीलपैकी किती प्रश्‍नांची उत्तरे बरोबर देता येतात...

१) पृथ्वीवर सात खंड आहेत. पण एका आगळ्यावेगळ्या देशाला कौतुकाने ‘पृथ्वीवरील आठवा खंड’ असे म्हणतात. तो देश कोणता?
Hint- ‘लीमर’ नामक प्राणी पृथ्वीवर केवळ याच ठिकाणी आढळतात.

२) भारतात एका राज्यात जगप्रसिद्ध असे ‘लिव्हिंग रूट ब्रिजेस’- अर्थात ‘जिवंत पूल’ आहेत. वृक्षांची मुळे एका दिशेने वाढू देऊन व विशिष्ट पद्धतीने ती एकत्र बांधून, वर्षानुवर्षांच्या मेहनतीने हे पूल तयार केले जातात. कुठे आहेत हे पूल?
Hint- हे ठिकाण ईशान्य भारतात आहे.

३) ऑस्ट्रेलियामध्ये एक प्रसिद्ध तळे चक्क ‘बबलगम पिंक’ रंगाचे आहे. तळ्याच्या पाण्याला असा रंग कशामुळे येत असेल?

४) काही विशिष्ट ठिकाणी समुद्राच्या लाटांची हालचाल होताना त्यात प्रकाशकणांची ‘चम-चम’ बघायला मिळते. झाडांवर काजवे चमकतात, तसे पाण्यातही काजवे चमकतात का, असे वाटते. पण पाण्यात दिसणारी ही चमचम काजव्यांमुळे नव्हे, तर एक प्रकारच्या सूक्ष्मजीवांमुळे घडते. या सूक्ष्मजीवांना काय म्हणतात?

५) तमिळनाडू ते रामेश्‍वरम मार्गावर भारतातील पहिला- वर उचलला जाणारा (म्हणजे ‘व्हर्टिकल लिफ्ट’) समुद्री रेल्वे पूल आहे. समुद्रात बोटी व जहाजे येतात, तेव्हा या पुलाचा भाग स्वयंचलित पद्धतीने, रेल्वेच्या रुळांसकट हवेत उचलला जातो आणि बोटी पुढे गेल्यावर पूर्ववत खाली आणून ठेवला जातो. या नवीन पुलाचे नाव काय?

६) तुम्ही ‘इंटरनॅशनल स्पेस स्टेशन’- अर्थात ‘आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानका’चे नाव ऐकलेच असेल. या स्थानकाला वीज कशी पुरवतात?

उत्तरे १) मादागास्कर २) मेघालय ३) विशिष्ट प्रकारच्या शैवाल व सूक्ष्मजीवांमुळे ४) फायटोप्लँक्टन ५) पंबन पूल ६) सौर ऊर्जेद्वारे हे स्थानक स्वत:ची वीज तयार करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MVA Legislative Council : विधानपरिषदेवरून महाविकास आघाडीत एकमत नाही, काँग्रेस, ठाकरे गटात ठिणगी पडली

Ambajogai Robbery Case : अंबाजोगाईतील 'हायप्रोफाईल' घरफोडीचा एलसीबीकडून छडा; फरार म्होरक्याला बेड्या, कोट्यवधींचा ऐवज जप्त

Otur News : खासगी क्लासेसवर अंकुश कोणाचा? कठोर पावले उचलण्याची गरज

Asian Games: शेवटच्या दिवशी ५ GOLD! कुमकुम, अमन, प्रणवीपाठोपाठ हॉकी-क्रिकेट संघांची सुवर्ण कामगिरी; भारताच्या खात्यात ८५ मेडल्स

Beed News : उच्च पगाराचे आमिष! म्यानमारच्या सायबर नरकात अडकल्या ३२ मराठी जिवांची होणार सुटका; बीडच्या स्वप्नील काळुंकेसह भारतीयांसाठी म्यानमार सरकार करणार 'रेस्क्यू ऑपरेशन'

SCROLL FOR NEXT