पुणे

पुण्यातील लॉकडाऊन वाढणार का? तर जिल्हाधिकारी म्हणतात...

सकाळवृत्तसेवा

पुणे : मुंबई, पुण्यासह राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून, लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढविण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. परंतु सद्यस्थितीत तीन मेपर्यंत लॉकडाऊन कायम राहील. मात्र, रुग्णांची संख्या वाढतच राहिल्यास यापुढील काळात लॉकडाऊनमध्ये वाढ होऊ शकते, असे संकेत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले.

पुणे, मुंबईसह राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. राज्य सरकारने हॉटस्पॉट वगळता अन्य काही भागात उद्योगांना परवानगी दिली आहे. त्यामुळे काही प्रमाणात रोजगारावरील संकट काही प्रमाणात दूर होण्यास मदत होत आहे. तथापि, राज्यातील लॉकडाऊन कधी संपणार, परिस्थिती पूर्वपदावर कधी येणार? रेल्वे, बसेस, लोकल सेवा पुन्हा कधी सुरू होणार, असे अनेक प्रश्न नागरिकांना पडले आहेत. त्यातच पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढविण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे.

या संदर्भात जिल्हाधिकारी राम यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सध्या तीन मेपर्यंत लॉकडाऊन राहील. मात्र, यापुढील काळात नागरिकांनी स्वयंशिस्त न पाळल्यास तसेच रुग्णांची संख्या वाढतच राहिल्यास लॉकडाऊनमध्ये वाढ होऊ शकते. परंतु, याबाबत अंतिम निर्णय केंद्र व राज्य सरकार घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

अफवांवर विश्वास ठेऊ नका

नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. स्वयंशिस्त पाळावी. कोरोनाला हरवण्यासाठी नागरिकांनी आपल्या घरी सुरक्षित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राम यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुकाराम मुंढेंना राजकारणात येण्याची ऑफर कुणी दिली? एका दिवसासाठी मुख्यमंत्री झाले तर काय करणार? काय म्हणाले मुंढे?

FDA Crime : मंचर बनावटदूध भेसळ प्रकरण; तीन आरोपींच्या घरांची झडती, लॅपटॉप, कागदपत्रे केली जप्त

Shivneri Fort Landslide : किल्ले शिवनेरी येथे शिवाई देवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर पावसामुळे वाहून आला मातीचा ढिगारा

Raigad Heavy Rain : पाऊस आला धावून, अन् रस्ते गेले वाहून; रायगड जिल्ह्यात रस्ते व महामार्गांची दूरवस्था प्रवाशांचा जीव धोक्यात

IND vs ENG 3rd T20I: भारतीय संघाने टॉस जिंकला! ज्याच्यामुळे मागची मॅच हरली, त्याला केले संघाबाहेर; बघा कशी आहे Playing XI

SCROLL FOR NEXT