पुणे

पुणे - ब्रेक निकामी होताच ड्रायव्हर पळाला; ३ जणांचा चिरडून मृत्यू

विठ्ठल तांबे

नवले पुलावर होणारी अपघाताची मालिका थांबण्याची चिन्हे अजुनही दिसत नाहीत.

पुणे - नवले पुलावर (Navale Bridge) होणारी अपघाताची मालिका थांबण्याची चिन्हे अजुनही दिसत नाहीत. आज मंगळवारी पुन्हा एकदा अपघात झाला असून यात ३ ते ४ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.नऱ्हे (Narhe) गावातील नवले पुलाजवळील भूमकर ब्रिजवर हा सकाळी साडेनऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली. वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न भूमकर पुलाच्या उतारावर आयशर ट्रक मागे सरकला. त्यावेळी रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावरून आयशर ट्रक गेला. घटनेनंतर सिंहगड (Singhgad) वाहतूक विभाग आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहे. अपघातानंतर वाहतुकीची कोंडी झाली असून ती सुरळीत करण्यात येत आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मुंबईकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या आयशरचा ब्रेक निकामी झाला. यामुळे चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर आयशर उताराच्या दिशेने मागे सरकल्यानंतर ड्रायव्हर पळून गेला. गाडी तशीच सोडून दिल्याने ती रस्त्यावर उभा असणाऱ्यांच्या अंगावर गेला. यात आयशर ट्रकखाली चिरडून तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तिघेही रोजंदारी करणारे कामगार असल्याची माहिती मिळत आहे. शिवाय ट्रक काही कारना धडकला असून यात तीन ते चार जण जखमी झाले असल्याचं सांगण्यात येत आहे.

महामार्गावर अपघातानंतर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. सिंहगड वाहतूक विभाग तसेच सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रशांत कणसे व पोलिस कर्मचारी वाहतूक सुरळीत करत आहेत. दरम्यान, अपघाताच्या ठिकाणी बघ्यांनीसुद्धा मोठी गर्दी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Deputy Collector: राज्यातील चाळीसपेक्षा जास्त तहसीलदारांचं प्रमोशन; नायब तहसीलदारांचीही तहसीलदारपदी पदोन्नती

Mirza Fakhrul Alamgir: बांगलादेशमध्ये मोठी राजकीय उलथापालथ! BNPचे मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर नवे राष्ट्रपती, किती मतं मिळाली?

Virender Sehwag Son: जसा बाप, तसा बेटा! आर्यवीरचा शॉट पाहून चाहत्यांना झाली विरेंद्र सेहवागची आठवण, Video Viral

DJ वाल्यांनो लक्ष द्या! बेस-टॉपला हिरवा कंदील, ‘प्रेशर मिड’वर पोलिसांची नजर; पुण्यात गणेशोत्सवातील DJसाठी लवकरच नियमावली

Nalasopara Accident: भरधाव गाडीचा थरार; १६ वर्षांच्या मुलाने दोन महिलांना चिरडलं, एकीचा मृत्यू, एक गंभीर

SCROLL FOR NEXT