Navle Bridge Accident Sakal
पुणे

Navle Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; दगडी कोळसा वाहून नेणारा कंटेनर उलटला

हा कंटेनर 100 मीटर पर्यंत फरफटत आला आहे

विठ्ठल तांबे

धायरी : मुंबई बंगळुरू महामार्गावर पुण्यातील नऱ्हे परिसरात नवले पुलाजवळील भूमकर पुलावर कंटेनर सकाळी साडेदहाच्या सुमारास पलटी झाल्याची घटना घडली आहे. हा कंटेनर साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेने कोळसा वाहून नेत होता. या अपघातात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

अधिक माहितीनुसार, भूमकर पुलाजवळ हा कंटेनर अक्षरशः लोखंडी दुभाजक तोडून विरुद्ध दिशेला जाऊन उलटला असून, कंटेनर मधील कोळसा महामार्गावर पसरला आहे. तर या ठिकाणी बघ्याची मोठी गर्दी झाली आहे. अपघातात कंटेनरचा चालक जखमी झाला असून त्याला खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दुभाजक तोडून कंटेनर रस्त्याच्या विरूद्ध दिशेला जवळपास १०० मीटरपर्यंत फरपटत आल्याची माहिती आहे. घटनास्थळी सिंहगड वाहतूक विभाग दाखल झाले असून मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. पोलिसांकडून वाहतूक सुरळित करणाचे प्रयत्न सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local : मध्य रेल्वेचा पुन्हा खोळंबा, विक्रोळीजवळ तांत्रिक बिघाड; लोकल ३० ते ४० मिनिटं उशिरा, स्थानकांमध्ये गर्दी

Stock Market Today: शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात! IT शेअर्सचा जोरदार कमबॅक; पाहा कोणते शेअर्स वाढले?

T20 WC, IND vs ZIM: टिम इंडियात ट्विस्ट... संघाचा विश्वासार्ह फिनिशर परतला; आता समीकरणच बदलणार?

आमच्यामध्ये वाद आहेत... भावासोबतच्या नात्यामधील तणावावर पहिल्यांदाच बोलला अजिंक्य देव; म्हणाला- एक भाऊ म्हणून ...

केंद्राकडून निधी मिळेना, मंत्र्यांचं रडगाणं; पाठपुरावा करा म्हणत राहुल नार्वेकरांनी विधानसभेत दोन नेत्यांना फटकारलं

SCROLL FOR NEXT