Navle Bridge To Sinhagad Road Encroachments Cleared By pmc and PCMC sakal
पुणे

Pune: नवले पूलाच्या सर्व्हिस रोडने घेतला मोकळा श्वास, अतिक्रमणावर फिरला मनपाचा बुलडोझर

Pune Latest Update: पीएमआरडीए व पुणे महानगरपालिका अतिक्रमण विभाग यांचे मार्फत संयुक्त कारवाई करण्यात येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

निलेश चांदगुडे

Navle Bridge: पुणे महानगरपालिकेच्या झोन क्र. दोन अतिक्रमण अनधिकृत बांधकाम निर्मूलन व पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम बांधकाम विभाग, सिंहगड रोड वाहतूक पोलीस विभाग व पोलीस निरीक्षक यांच्यामार्फत बुधवारी ( ता. ३१) पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे व पुणे महानगरपालिका उपायुक्त माधव जगताप यांच्या आदेशानुसार नवले पूल ते सिंहगड रोड येथे संयुक्त कारवाई करण्यात आली.

पीएमआरडीए हद्दीमधील अंदाजे एक हजार चौ.फुट व पुणे मनपा हद्दीतील अंदाजे पाच हजार चौ. फुट क्षेत्र मोकळे करण्यात आले. या कारवाई करीता पीएमआरडीए मधील अनधिकृत बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता धनंजय झालटे व सिंहगड वाहतूक पोलीस विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार बरडे, पुणे महानगरपालिकेचे बांधकाम विकास विभागाचे उपअभियंता विजय कुमावत, कनिष्ठ अभियंता महेश झोमन, मयूर गेडाम, इरफान शेख व विभागीय अतिक्रमण निरीक्षक नारायण साबळे, क्षेत्रीय अतिक्रमण निरीक्षक उमेश नरूले, अतिक्रमण निरीक्षक अजय गोळे, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक सागर विभुते, विठ्ठल ओमासे, मंथन आमले उपस्थित होते.

या कारवाई करिता 02 जेसीबी, 02 ब्रेकर, 01 गॅस कटर, 01 बंदिस्त पिंजरा, 02 ट्रक 20 बिगारी सेवक यांचे सहाय्याने कारवाई करण्यात आली. व यापुढे पीएमआरडीए व पुणे महानगरपालिका अतिक्रमण विभाग यांचे मार्फत संयुक्त कारवाई करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aadhaar LPG Link : आधार-LPG लिंक नाही? तर सबसिडी बंद होणार! सरकारचा इशारा; आजच घरबसल्या 'असे' करा लिंक

Igatpuri Crime : शिक्षकी पेशाला काळिमा! नराधम शिक्षकाचा चिमुकलीवर ८ महिने अत्याचार; घोटी पोलिसांकडून अटक

Latest Marathi News Live Update : मनसे आणि ठाकरेंच्या सेनेचे नगरसेवक एकत्र कोकण भवनला जाणार

Shiv–Shahu Vikas Aghad : पराभवातून बोध घेणार का? शिव–शाहू आघाडीपुढे मोठे आव्हान

जय शाह यांनी डोळे वटारताच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची भाषा बदलली; बांगलादेशला जाहीर सपोर्ट करणारे आता कोपऱ्यात जाऊन बसले, म्हणतात...

SCROLL FOR NEXT