devi
devi 
पुणे

पुणे : मांजरी परिसरात नवरात्रोत्सव उत्साहात

कृष्णकांत कोबल

मांजरी : घटस्थापनेच्या दिवशी जयघोष व मिरवणूक काढून स्थानापन्न झालेल्या देवीचा नवरात्रोत्सव धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक व विविध करमणूकीचे कार्यक्रम करून उत्साहात साजरा केला जात आहे. मांजरी बु्द्रुक, हडपसर, शेवाळवाडी, साडेसतरानळी परिसरात देवीचे दर्शन व दररोजच्या आरतीसाठी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. 

मांजरी गावठाणातील ग्रामदेवता मांजराई देवीचा नवरात्रोत्सव विविध धार्मिक, पारंपारिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून उत्साहात साजरा केला जात आहे. दर वर्षी चंपाषष्टीला या ग्रामदेवतेचा उत्सव विविध कार्यक्रमाने साजरा केला जातो. या देवीची स्थापना पांडवांनी केली असल्याची कथा सांगितले जाते. हेमाडपंथी रचनेच्या या मंदिरावर उत्सवानिमित्त विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच शोभिवंत फुलांनी व रोपांनी परिसराची सजावट करण्यात आली आहे. देवीची वर्षभर पूजाअर्चा केली जाते.

महादेवनगर येथे दुर्गामाता मंदिरात उत्सव साजरा केला जात आहे. येथील हेमाडपंथी आकर्षक मंदिरात वर्षभर विधिवत पूजा अर्चा केली जात आहे. संस्थापक दिलीप कामथे यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज धार्मिक कार्यक्रम होत आहेत. येथील आरतीसाठी दररोज मोठी गर्दी होत आहे.   

गोपाळपट्टी येथील एकता कला व क्रिडा मंडळाच्या उत्सवाचे हे 23 वे वर्ष आहे. सजावटीसाठी विद्युत रोषणाई केली आहे. घागरे कुटुंबाने देवीसाठी कायमस्वरूपी जागा दिलेली आहे. वर्षभर तेथे देवीची पूजा केली जाते. येथील तरूण कार्यकर्ते उत्सवाचे संयोजन करीत आहेत.

पंधरा नंबर येथील शितळा देवीचा उत्सवाला सुमारे शंभर वर्षाची परंपरा सांगितली जात आहे. राज्यातील घाडगे गोसावी समाजाचे नागरिक दरवर्षी उत्सवासाठी येत असतात. विलास कौतिक घाडगे व विलास सावकार घाडगे पूजारी म्हणून काम पाहत आहेत. भाऊसाहेब घाडगे, राम घाडगे, दादासाहेब घाडगे, रामभाऊ घाडगे, दादा घाडगे मंदिराचे व्यवस्थापन पाहत आहेत. 

याच चौकात सर्जेराव तुपे यांनी स्थापन केलेले भवानीमातेचे मंदिर आहे. या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात उत्सव भरविण्यात आला आहे. परिसरातील नागरिक विशेषतः महिला मोठ्या संख्येने दर्शनासाठी अवर्जून येत आहेत.

अखील शेवाळवाडी नवरात्रोत्सव मंडळाने देवीच्या कायमस्वरूपी मंदिरातच उत्सव भरविला आहे. सोलापूर महामार्गावरील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रासमोर तरूण मंडळाने देविची स्थापना केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद; पॉवर शेअर्स बनले 'सुपरस्टार'

IPL 2024: केकेआरचा स्टार खेळाडू आता बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री; स्मृती मानधनाच्या बॉयफ्रेंडनं दिली संधी

Crime News : बुलढाणा जिल्ह्यात एकाच दिवशी 22 डीजे वर कारवाई; 6 लाख 32 हजार दंड, व गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : अमेठी-रायबरेलीमधून राहुल-प्रियांका यांच्या उमेदवारीबाबत जयराम रमेश काय म्हणाले?

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

SCROLL FOR NEXT