पुणे

शिरूर परिसरात घुमला संबळाचा नाद

CD

शिरूर, ता. ११ : आदिशक्तीच्या वैविध्यपूर्ण रूपांच्या भव्य मिरवणुका, सोबत पारंपारिक वाद्यांचा जल्लोष... टाळ - मृदुंगांचा गजर तर कुठे ठेका धरायला लावणारा संबळ - तुणतूण्याचा बाज... शहर व परिसरात शारदीय नवरात्रोत्सवाला उत्साही वातावरणात सुरुवात झाली. सार्वजनिक ठिकाणी विविध रूपांच्या माध्यमातून तर घरोघरी घटस्थापनेच्या माध्यमातून लक्ष्मीची पावले उमटली...
पाषाणमळा टेकडीवरील रेणुकामाता, सरदार पेठेतील चामुंडादेवी, आडत बाजारातील शितळा माता, जोशीवाडीतील महालक्ष्मी, गुजरमळ्यातील तुळजाभवानी, लाटेआळीतील दुर्गादेवी, सिद्धार्थनगरमधील अंबिका माता, सुभाष चौकातील यल्लम्मादेवी, काचीआळीतील लक्ष्मीमाता तसेच भवानी मातेच्या मंदिरात पारंपारिक पद्धतीने शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. रेणुकामाता मंदिरावर व पाषाणमळा टेकडीवर रोषणाई केली असून, नऊ दिवस विविध धार्मिक विधींचे आयोजन केले आहे.
शहरात दहा सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळे असून विविध सामाजिक, धार्मिक उपक्रमांनी हा सोहळा साजरा केला जातो. विविध मनोरंजनाचे कार्यक्रम तसेच विविध स्पर्धांचे आयोजनही केले आहे. सुभाष चौकातील आझाद हिंद गणेश मंडळाने अंबिका माता, प्रोफेसर कॉलनीतील एकता मित्र मंडळाने दुर्गामाता, बी. सी. हौसिंग सोसायटीतील दर्शक मित्र मंडळाने जगदंबा माता, त्रिमूर्ती महिला मित्र मंडळाने तुळजाभवानी, काचीआळीतील जय भवानी मित्र मंडळाने दुर्गामाता, साईनगर मित्र मंडळाने भवानी माता, अंबिकामाता मित्र मंडळाने अंबिकामाता, इंदिरानगरमधील जय माता दी मित्र मंडळाने महालक्ष्मी, छत्रपती संभाजीनगर मधील जय भवानी नवरात्रोत्सव मंडळाने तुळजाभवानी, आदिशक्ती महिला मंडळाने परमेश्वरी देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. लाटेआळीत माजी नगरसेविका पूजाताई जाधव यांनी दुर्गादेवीची तर खारामळ्यातील महिला मंडळाने अंबिकामातेची प्रतिष्ठापना केली आहे.
दरम्यान, बाबूरावनगरमधील जय भवानी मित्र मंडळाने दुर्गामातेची प्रतिष्ठापना केली असून, बाफणानगरमध्ये नवदुर्गा भजनी मंडळाने टाळ - मृदुंगाच्या गजरात दुर्गादेवीची प्रतिष्ठापना केली. तर्डोबाची वाडी येथील जोगेश्वरी, गोलेगाव जवळील कृष्णामाई आणि सतरा कमानी पुलाजवळील शिवची आई या आदिशक्तीच्या मंदिरांमध्येही सकाळपासून भाविकांची, भगिनींची दर्शनासाठी गर्दी झाली होती. या ठिकाणी नवरात्रात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India CPI Inflation: देशात पुन्हा महागाईचा भडका! दुष्काळ अन् वाढत्या महागाईत ग्रामीण भागाची दुहेरी होरपळ

IND vs WI: विंडिजच्या दोन खेळाडूंवर ICC ची कारवाई; भारताविरुद्ध T20I मालिका सुरू असतानाच नेमकं काय घडलं?

Rahul Gandhi: राहुल गांधींचा मोठा दावा! म्हणाले, ''मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे मला मेसेज येतात..''

Someshwar Sugar Factory Election Result : सोमेश्वर कारखान्याच्या निवडणूकीत सुनेत्रा पवार यांच्या पॅनेलची मुसंडी.... विजयाच्या दिशेने घौडदौड.....; पुरुषोत्तम जगताप यांना दारुण पराभव

Sri Lanka Politics: आधी मुलगा, आता पत्नी अडचणीत; महिंदा राजपक्षे ICU मध्ये, श्रीलंकेत सध्या काय घडतंय?

SCROLL FOR NEXT