पुणे

उंब्रज येथे सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

CD

पिंपळवंडी, ता. ८ : उंब्रज क्र. १ (ता. जुन्नर) येथील श्री मळगंगा व श्री महालक्ष्मी मंदिराच्या प्रांगणात रविवार (ता. ११) ते शुक्रवार (ता. २३) या काळात नवरात्र महोत्सव साजरा होणार आहे. उंब्रज ग्रामविकास ट्रस्ट, ग्रामपंचायत, यात्रा समिती आणि पुणे-मुंबईकर ग्रामस्थांनी याचे आयोजन केले आहे.
रविवारी (ता. ११) सकाळी ९ ते १२ या वेळेत घटस्थापनेने उत्सवास प्रारंभ होईल. महोत्सवात दररोज सकाळी व सायंकाळी आरती, महापूजा, हरिपाठ व रात्री ७ ते ९ या वेळेत गणेश महाराज वाघमारे, ओंकार हगवणे, ज्ञानेश फलके, गणेश घोडेकर, जयेश भाग्यवंत, बाळकृष्ण गोगावले, उमेश दशरथे, समाधान शर्मा यांची कीर्तने होतील. दररोज सायंकाळी ६.३० वाजता देवीचा गोंधळ होईल.
सोमवारी (ता. १९) सकाळी ६.३० वाजता शृंगार पूजा, सकाळी ९ ते दुपारी २ महाप्रसाद आणि ११ वाजता आदर्श विद्यार्थी सत्कार होईल. रात्री १० वाजता अशोक हांडे यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्‍घाटन होऊन नाट्यप्रयोग सादर होईल. मंगळवारी (ता. २०) सकाळी ९ वाजता रक्तदान शिबिर, तर सकाळी १० ते ५ या वेळेत शाहीर अशोक भोर आणि नवनाथ काळे यांच्यात कलगी तुऱ्याचा सामना रंगेल. सायंकाळी ५ वाजता सीमोल्लंघन व पालखी सोहळा होईल. रात्री ९ वाजता ‘गाव तसं चांगलं’ हे नाटक सादर होईल. गुरुवारी (ता. २२) रात्री ९ वाजता श्री महालक्ष्मी प्रासादिक मंडळाचे भजन होईल. शुक्रवारी (ता. २३) सकाळी ८ वाजता पालखी ग्राम प्रदक्षिणा व दहीहंडी सोहळ्याने महोत्सवाची सांगता होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shirur News : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाच्या वृत्ताने आज शहर व परिसरातील कलाक्षेत्रावर शोककळा

नाना पाटेकर गेले, पण त्यांनी उभा केलेला ‘तो माणूस’ अजूनही जिवंत! राज ठाकरेंची भावूक पोस्ट

Latest Marathi News Live Update: अजिंठा- अंधारी धरणात पाटबंधारे विभागाची धडक कारवाई

Navratri 2026: ११ ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सव सुरु; नऊ दिवसांच्या व्रतात काय करावे अन् काय टाळावे? जाणून घ्या नियम...

SIR voter list: देशातील 42 निवृत्त न्यायमूर्तींचं खुलं पत्र! SIR वरुन सुरु असलेल्या वादावर स्पष्ट केली भूमिका

SCROLL FOR NEXT