मार्केट यार्ड, ता. १८ : नवरात्रोत्सवामुळे सलग दुसऱ्या आठवड्यातही मासळी, मटण, चिकन बाजारात मागणी कमी आहे. परिणामी, गणेश पेठेतील मासळी बाजारात बेताने माल मागविण्यात येत आहे. पापलेट, रावस वगळता सर्व मासळीचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत, तर पापलेट आणि रावसच्या भावात मात्र १० ते २० टक्के वाढ झाली आहे.
मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे मटण, चिकन आणि अंडीचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत. गणेश पेठ येथील घाऊक बाजारात रविवारी (ता. १८) खोल समुद्रातील मासळी पाच ते सहा टन, खाडीच्या मासळीची २०० ते ३०० किलो आणि नदीच्या मासळीची २०० ते ३०० किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची मिळून सुमारे पाच ते सात टन आवक झाली. दसऱ्यानंतर सामिष पदार्थांना मागणी वाढणार असल्याची माहिती मासळीचे व्यापारी ठाकूर परदेशी, चिकन विक्रेते रूपेश परदेशी आणि मटण दुकानदार संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी सांगितले.
खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव) - पापलेट : कापरी : १८००-२०००, मोठे : १५००-१८००, मध्यम : १२००-१५००, लहान : ८००-९००, भिला : ५००-७००, हलवा : ६००-७००, सुरमई ५००-७००, रावस : ८००-९००, घोळ : ६००-८००, करली : ३००-४००, भिंग : ४००-५००, पाला : लहान : ६००-७०० मोठा : १२००-१५००, वाम : पिवळी ६००-८००, काळी : ३००-४००, ओले बोंबील : १००-२००. कोळंबी : लहान : १५०-२४०, मध्यम : ३५०-४८०, मोठी : ६००-८००, जम्बो प्रॉन्स : १४००-१५००, किंग प्रॉन्स : ७००-८००, लॉबस्टर : २०००-२२००, मोरी : १५०-२००, मांदेली : १००-१४०, राणीमासा : २००-२४०, खेकडे : ३००-३५०, चिंबोऱ्या : ६००-८००. खाडीची मासळी - सौंदाळे : २४०-२८०, खापी : २००-२४०, नगली : ३००-४००, तांबोशी : ४००-५००, पालू : २००-२४०, लेपा : २००-२४०, बांगडा : १८०-२४०, शेवटे : २००-२४०, बेळुंजी : १२०-१८०, तिसऱ्या : २५०-३००, खुबे : १२०-१६० तारली : २००-२४० नदीतील मासळी : रहू : १६०-२००, कतला : १८०-२२०, मरळ : ३५०-४००, शिवडा : १८०-२००, खवली : १८०-२००, आम्ळी : ८०-१४०, खेकडे : २५०-३००, वाम : ४००-४५०.
मटण : बोकड : ८४०, बोलाई : ८४०, खिमा : ८४०, कलेजी : ८८०.
चिकन : २५०, लेगपीस : ३००, जिवंत कोंबडी : १७०, बोनलेस : ३५०.
अंडी : गावरान (शेकडा) : १२१०, डझन : १५६, प्रतिनग : १३. इंग्लिश (शेकडा) : ६००, डझन : ८४, प्रतिनग ७.००
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.