chaturshrungi temple chaturshrungi temple
पुणे

Navratrotsav : पुण्यात नवरात्रोत्सवानिमित्त मंदिर परिसरात वाहतुकीत बदल

भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पुणे शहरातील तांबडी जोगेश्वरी मंदिर, चतु:शृंगी मंदिर, भवानी माता मंदिर आणि महालक्ष्मी मंदिर परिसरात वाहतूक बदल करण्यात आले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - नवरात्रोत्सवाच्या कालावधीत मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी तांबडी जोगेश्वरी मंदिर, चतु:शृंगी मंदिर, भवानी माता मंदिर आणि महालक्ष्मी मंदिर परिसरात वाहतूक बदल करण्यात आले आहेत. या भागात गुरुवार (ता. ३) पासून वाहतुकीत बदल करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली.

अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौकाकडे जाणारा रस्ता वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे. बुधवार चौक ते अप्पा बळवंत चौकदरम्यान एकेरी वाहतूक सुरू राहील. पर्यायी मार्ग : अप्पा बळवंत चौक येथून छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याने इच्छितस्थळी जाता येईल.

तांबडी जोगेश्वरी मंदिर - लक्ष्मी रस्त्यावरील गणपती चौक ते तांबडी जोगेश्वरी मंदिरदरम्यान वाहनांना प्रवेश बंद राहील.

पर्यायी मार्ग - ‘सकाळ’ कार्यालयापासून तांबडी जोगेश्वरी मंदिराकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. तांबडी जोगेश्वरी मंदिर परिसरात आणि शनिवार पेठेतील अष्टभुजा मंदिर परिसरात वाहनांना पार्किंगसाठी मनाई करण्यात आली आहे. तांबडी जोगेश्वरी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी नदीपात्रातील रस्ता आणि मंडईतील वाहनतळावर वाहने पार्क करावीत.

चतु:शृंगी मंदिर - सेनापती बापट रस्त्यावरील चतु:शृंगी मंदिर परिसरात आवश्यकतेनुसार वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. सेनापती बापट रस्त्यावरील वाहतूक वेताळबाबा चौकमार्गे दीप बंगला चौकमार्गे वळविण्यात येणार आहे.

भवानी माता मंदिर - रामोशी गेट ते जुना मोटार स्टॅंडदरम्यान भवानी माता मंदिरासमोरील महात्मा फुले रस्ता दोन्ही बाजूंनी वाहतुकीसाठी बंद राहील. पंडित नेहरू रस्ता ते भवानी माता मंदिर परिसरात वाहने पार्क करण्यास मनाई करण्यात आली आहे.

अथर्वशीर्ष पठणानिमित्त वाहतूक बदल -

सारसबाग येथील महालक्ष्मी मंदिर परिसरात शुक्रवारी (ता. ४) पहाटे पाच ते सकाळी सात वाजेपर्यंत अथर्वशीर्ष पठण कार्यक्रम होणार आहे. या कालावधीत स्वारगेटकडून सारसबागमार्गे स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्याकडे जाणारा रस्ता वाहतुकीस बंद राहील. मित्रमंडळ चौकाकडून पूरम चौकाकडे येणारा मार्ग वाहतुकीस बंद असेल. मित्रमंडळ चौकातून येणाऱ्या वाहनांना स्वातंत्र्यवीर सावरकर चौकातून सिंहगड रस्तामार्गे इच्छितस्थळी जावे. तसेच, सिंहगड रस्त्याने स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात येणाऱ्या वाहनचालकांनी लक्ष्मीनारायण चौकातून इच्छितस्थळी जावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Blood Donation Recovery: रक्तदान केल्यानंतर शरीरात कोणते बदल होतात? शरीर कसं रिकव्हर होतं? ‘या’ 3 गोष्टी ठेवा लक्षात

Illegal Sand Mafia Attack: अंबडमध्ये अवैध वाळू उपशावर कारवाईला गेलेल्या तहसीलदारांसह महसूल पथकाला वाळू माफियांची मारहाण; हायवा ट्रक धडक देत पळवले

SCROLL FOR NEXT