4supremecourt_30.jpg
4supremecourt_30.jpg 
पुणे

नक्षल कनेक्शन : पाच जणांच्या नजरकैदेत 17 सप्टेंबरपर्यंत वाढ

सकाळवृत्तसेवा

पुणे : नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून ताब्यात घेतलेल्या पाच जणांची नजरकैदत असेलल्या 17 सप्टेंबरपर्यंत वाढविण्याचा निर्णय आज (बुधवार) सर्वोच्च न्यायालयाकडून घेण्यात आला.

पाच कार्यकर्त्यांना असहमतीच्या त्यांच्या दृष्टिकोनामुळे नाही; तर बंदी घातलेल्या भाकप (माओवादी)शी त्यांच्या संपर्कासंबंधीच्या ठोस पुराव्याच्या आधारे अटक करण्यात आली असल्याचा दावा महाराष्ट्र पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात केला होता. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने 29 ऑगस्टला या कार्यकर्त्यांना 6 सप्टेंबरपर्यंत त्यांच्या घरातच नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिले होते. 6 सप्टेंबरला या नजरकैदेत 12 सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली होती. त्यानुसार आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते.  आज नजरकैदेची मुदत संपल्यानंतर यामध्ये 17 सप्टेंबरपर्यंत आणखी 5 दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

महाराष्ट्र पोलिसांनी 28 ऑगस्टला अनेक राज्यांत प्रमुख डाव्या कार्यकर्त्यांच्या घरावर छापे मारले होते आणि माओवाद्यांशी संपर्कात असलेल्या संशयावरून तेलुगू कवी वरवरा राव, व्हेर्नोन गोन्झाल्विस, अरुण फरेरा, सुधा भारद्वाज, गौतम नवलखा या पाच कार्यकर्त्यांना अटक केली होती. मानवाधिकार कार्यकर्त्यांनी या अटकेला जोरदार विरोध दर्शविला होता. गेल्या वर्षी 31 डिसेंबरला पुणे येथे आयोजित एल्गार परिषद कार्यक्रमानंतर कोरेगाव भीमा गावात भडकलेल्या हिंसाचाराचा तपास करताना पोलिसांनी हे छापे टाकले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT