Court 
पुणे

शरणागती पत्करलेल्या नक्षलवादी कृष्णा दोरपटे याने न्यायालयासमोर दिली साक्ष

सकाळवृत्तसेवा

पुणे - अरुण भेलके हा माओवादी नेता दीपक ऊर्फ मिलिंद तेलतुंबडे सोबत माओवादी चळवळीत सक्रीय होता. शहरी भागात माओवादी चळवळ पसरविण्याचे काम अरुण व त्याची पत्नी करीत. जंगलात त्याची व आपली तेलतुंबडेच्या उपस्थित भेट व चर्चा झाली आहे, अशी साक्ष शरणागती पत्करलेल्या नक्षलवादी कृष्णा दोरपटे याने बुधवारी न्यायालयासमोर दिली. दोरपटे हा गडचिरोली येथील शरणागत नक्षलवादी आहे. माओवादाच्या गुन्ह्यात अटक अरुण भेलके प्रकरणात विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्यासमोर त्याची साक्ष झाली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. उज्ज्वला पवार यांनी कृष्णाची तपासणी घेतली. मी नक्षल दलामध्ये सक्रिय असताना जंगलात दीपक ऊर्फ मिलिंद तेलतुंबडेची भेट झाली. तेव्हा त्यासोबत शहरी भागात काम करणारे जानकी, समर व अन्य काही जण सोबत होते, असेही कृष्णाने न्यायालयात सांगितले. दरम्यान, अरूणचे वकील रोहन नहार यांनी उलट तपासणी घेतली. कृष्णा व आरोपीची भेट झालेली नाही. कृष्णा हा शरणागत नक्षलवादी असल्याने सरकारकडून मदत मिळेल या आशेने पोलिसांनी सांगितल्यानुसार जबानी देत आहे. अरुण याचा या गुन्ह्याशी काहीही संबंध नाही. पत्नीच्या आजारपणामुळे तो २०११ पासून पुणे- मुंबई या ठिकाणी राहत आहे. त्याच्यावर पूर्वीचे प्रलंबीत गुन्हे असल्यामुळे तो नाव बदलून राहतो आहे. त्यामुळे त्याचा या गुन्ह्याशी संबंध आहे हे म्हणणे चुकीचे आहे, असा युक्तिवाद ॲड. नहार यांनी केला. त्याने कोणताही गुन्हा केला नसल्याचे व नक्षलवादी चळवळीत तो कार्यरत नसल्याचे नहार यांनी न्यायालयाला सांगितले. या प्रकरणाची पुढील सुनावणी १९ मार्च रोजी होणार आहे.

कांचनच्या वस्तू अरुणला द्याव्यात
कांचन हिचा नुकताच मृत्यू झाला आहे. तिच्या वस्तू व त्यांनी लिहिलेली पत्रे, तीने कारागृहात केलेले लिखाण हे कारागृह प्रशासनाने त्यांच्याकडे आहे. ते मिळण्याचा अधिकार अरुणला आहे. परंतु, कारागृह कांचनच्या वस्तू अरुणला द्यायला विरोध करत आहे. त्यामुळे न्यायालयाने त्या वस्तू अरुणला देण्यासंबंधी आदेश करावेत, अशी मागणी ॲड. नहार यांनी न्यायालयाकडे केली.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख - घरंगळणारा रुपया

Nanded Election : देगलुर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी ७१.३० % मतदान; शहरातील मतदान केंद्रावर सकाळपासून लांबच लांब रांगा!

NHAI-Jio safety alert system: ‘हायवे’वरील धोक्यांचा इशारा आता मोबाइलवर आधीच कळणार ; 'NHAI-Jio' मध्ये करार!

मैदानी चाचणी फेब्रुवारीपासून! पोलिस भरतीत एका पदासाठी ८३ उमेदवार; इच्छुकांना रविवारपर्यंत करता येईल अर्ज; १५,६३१ पदांची भरती

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत सरकारचं मोठं विधान; कर्मचाऱ्यांची 'ही' मागणी फेटाळून लावली

SCROLL FOR NEXT