पुणे

राज्य बँकेला पाच हजार कोटींचे कर्ज

CD

पुणे, ता. १२ : राज्याच्या सहकार क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक ठरणाऱ्या निर्णयात राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने (एनसीडीसी) महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला पाच हजार कोटी रुपयांचे खेळते भांडवली कर्ज मंजूर केले आहे. ‘एनसीडीसी’कडून एवढ्या मोठ्या रकमेचे कर्ज मंजूर होणारी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक देशातील पहिली बँक ठरली आहे. या निधीचा वापर बँकेच्या सभासद सहकारी संस्थांना कर्जपुरवठा करण्यासाठी करण्यात येणार आहे.

‘एनसीडीसी’ने १० ऑगस्टला जारी केलेल्या मंजुरीपत्रानुसार, थेट निधी पुरवठा योजनेंतर्गत पाच वर्षांच्या कालावधीसाठी हे कर्ज मंजूर केले आहे. त्यामुळे राज्यातील सहकारी संस्थांच्या खेळत्या भांडवलाच्या गरजा भागविण्यासह त्यांच्या आर्थिक व्यवहारांना अधिक गती मिळण्याची अपेक्षा आहे.
राज्य सहकारी बँक ही राज्यातील सहकारी बँकिंग व्यवस्थेची शिखर संस्था आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, विविध सहकारी संस्था आणि सहकार क्षेत्रातील अन्य घटकांना वित्तपुरवठा करण्यामध्ये बँकेची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या वित्तीय साहाय्यामुळे राज्यातील सहकारी संस्थांच्या भांडवली गरजा पूर्ण करण्यासाठी बँकेला अतिरिक्त आर्थिक बळ मिळणार आहे. मंजूर कर्जाचा कालावधी पाच वर्षांचा असून, त्याची परतफेड दहा सहामाही हप्त्यांमध्ये करण्याची तरतूद आहे.
‘एनसीडीसी’सोबतच्या परस्पर सल्लामसलतीने कर्जाची उचल एक किंवा त्यापेक्षा अधिक हप्त्यांमध्ये करता येणार आहे.
परतफेड केलेल्या मुद्दलाच्या ठरावीक मर्यादेपर्यंत परतफेडीनंतर निधी उभारण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे राज्य बँकेला खेळत्या भांडवलाचे व्यवस्थापन अधिक लवचीकपणे करता येणार आहे.

केंद्र आणि राज्यातील सहकारी वित्तसंस्थांमधील समन्वय, परस्पर विश्वास आणि सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण आहे. राज्यातील सहकारी बँका, सहकारी संस्था आणि लाखो सभासदांच्या आर्थिक व्यवहारांना या निधीमुळे अधिक व्यापक आधार मिळण्याची अपेक्षा आहे.
- विद्याधर अनास्कर,
प्रशासक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नव्या मतदार नोंदणीसाठी महत्त्वाची बातमी! आता नोंदणीवेळी जुळवावी लागणार २४ वर्षांपूर्वीची वंशावळ; प्रशासनाला शोध सोलापुरातील ६ लाख मतदारांचा, वाचा...

Riddhi Thakkar: ‘लेट्स एक्सप्लोर बस्तर...’ २० बाइकरचा ग्रुप, सफरीचं स्वप्न ठरलं अखेरचं, अचानक काळाचा घाला; मुंबईच्या रिद्धीचा दुर्दैवी अंत

Khutbav Accident : नियतीचा खेळ, मृत्यूतही साधला मेळ; रक्षाबंधनापूर्वी बहीण-भावावर काळाचा घाला, पारगावात हळहळ

Talegaon Dabhade News : रस्ता नसल्याने ज्येष्ठाला उपचारासाठी झोळीतून नेण्याची वेळ

मोठी बातमी! मराठा समाजातील १.८१ लाख तरुण रोजगार मागणारे नव्हे रोजगार देणारे; ७ वर्षांत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून १८७४ कोटी

SCROLL FOR NEXT