पुणे

भोर आगारात महिला, ज्येष्ठांसाठी एनसीएमसी कार्ड सुविधा सुरू

CD

हिर्डोशी, ता. १८ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) सवलत योजनांचा लाभ घेणाऱ्या महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी १ ऑक्टोबरपासून नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) अनिवार्य केले आहे. या पार्श्‍वभूमीवर भोर एसटी आगारात पात्र लाभार्थ्यांसाठी कार्ड नोंदणी व वितरण प्रक्रिया सुरू केली आहे. भोर व परिसरातील प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आगार व्यवस्थापक राजेंद्र उबाळे यांनी केले आहे.
एसटी महामंडळामार्फत महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत दिली जाते. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी आता एनसीएमसी कार्ड उपयुक्त ठरणार आहे. भोर आगारामध्ये दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे कार्ड काढून देण्याची व्यवस्था केली आहे. कार्ड काढण्यासाठी २०० रुपये शुल्क निश्‍चित केले असून, प्रवाशांना आगारात जाऊन आपली नोंदणी करता येणार आहे.
हे कार्ड रिचार्ज करण्यासाठी महामंडळाने विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. प्रवाशांना वाहक, आगार किंवा ऑनलाइन माध्यमातून कार्ड रिचार्ज करता येईल. या सुविधेमुळे प्रवासादरम्यान होणाऱ्या पैशांच्या व्यवहारात सुलभता येणार आहे. महिला व ज्येष्ठ नागरिकांना सवलतीचा लाभ घेणे अधिक सोपे व्हावे, या उद्देशाने ही प्रक्रिया राबवण्यात येत असल्याचे उबाळे यांनी स्पष्ट केले. तरी जास्तीत जास्त प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: टायगर श्रॉफवर गोळीबार; दुचाकीवरून आले तीन हल्लेखोर,धक्कादायक व्हिडिओ समोर

‘मतचोरी’चा आरोप करूनही माझ्यावर मानहानीचा खटला नाही, कारण...; राहुल गांधींचा मोठा दावा!

Latest Marathi News Live Update : Tiger Shroff Firing Live : टायगर श्रॉफवरील गोळीबाराची मुख्यमंत्र्यांकडून दखल; पोलीस आयुक्तांशी चर्चा करत कठोर कारवाईचे आदेश

Yavatmal News: सोयाबीनने ओलांडला साडेसहा हजारांचा टप्पा; अत्यल्प पावसामुळे घटले उत्पादन, बाजारात आवक कमी

Leopard Attack: नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; सर्वांसमोर नेले उचलून, चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावरुन महाकालीच्या दर्शनासाठी निघाले अन्..

SCROLL FOR NEXT