पुणे

‘एनसीएमसी’ कार्डचे रिचार्ज वाहकाकडूनच करा अन् पैसे वाचवा;

CD

‘एनसीएमसी’ कार्डचे रिचार्ज वाहकाकडूनच करा अन् पैसे वाचवा
सवलतीच्या तिकिटांसाठी कार्ड नोंदणीची पावती असल्यास ३० सप्टेंबरपर्यंत मुदत
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १२ : राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना सवलतीचे तिकीट मिळवण्यासाठी ''एनसीएमसी'' स्मार्ट कार्ड अनिवार्य केले आहे. १ सप्टेंबरपासून लागू झालेल्या या नियमात प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने काही दिवसांची मुदतवाढ दिली आहे. तसेच, हे कार्ड रिचार्ज करताना खासगी एजंटऐवजी थेट एसटी वाहकाकडून (कंडक्टर) रिचार्ज केल्यास प्रवाशांचा आर्थिक फायदा होणार असल्याचे समोर आले आहे.
सवलतीच्या तिकिटांसाठी मुदतवाढ अन् सुधारित नियम १४ सप्टेंबरपर्यंत मॅन्युअल सवलत: मशीनद्वारे कार्ड रीड होण्यात तांत्रिक अडचणी आल्यास प्रवाशांना १४ सप्टेंबरपर्यंत पूर्वीप्रमाणे मॅन्युअली सवलतीचे तिकीट दिले जाईल.
३० सप्टेंबरपर्यंत पावतीवर प्रवास : ज्या प्रवाशांनी कार्डसाठी नोंदणी केली आहे मात्र अद्याप कार्ड मिळालेले नाही, त्यांना ३० सप्टेंबरपर्यंत नोंदणी पावती दाखवून सवलतीचा प्रवास करता येईल.
१ ऑक्टोबरपासून पूर्ण सक्ती : १ ऑक्टोबरपासून सर्व पात्र महिला व ज्येष्ठ नागरिकांना सवलतीचे तिकीट मिळवण्यासाठी केवळ ''एनसीएमसी'' कार्डचाच वापर करावा लागेल.
............
खासगी एजंट की एसटी वाहक;
कोणाकडून रिचार्ज करणे फायदेशीर?
एनसीएमसी कार्ड रिचार्ज करताना खाजगी एजंटकडून अतिरिक्त सेवा शुल्क (सर्व्हिस चार्ज) कापले जात असल्याने प्रवाशांच्या कार्डवर कमी शिल्लक (बॅलन्स) जमा होते. याउलट, एसटी वाहकाकडून (कंडक्टर) रिचार्ज केल्यास कमी सेवा शुल्कामुळे प्रवाशांना अधिक बॅलन्स मिळतो. यामुळे वाहकाकडे रिचार्ज करणे अधिक फायदेशीर ठरत आहे.

रिचार्ज रक्कम आणि मिळणारा निव्वळ बॅलन्स (तुलनात्मक तक्ता) :
रिचार्ज रक्कम वाहकाकडे मिळणारा बॅलन्स एजंटकडे मिळणारा बॅलन्स होणारा फायदा
५० ४९.४७ ३७.६७ ११.८०
१०० ९८.९४ ८७.१४ ११.८०
२०० १९७.८८ १८६.०८ ११.८०
५०० ४९४.७० ४८२.८९ ११.८१ १००० ९८९.४० ९७७.५८ ११.८२


..............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Balochistan Blast : बलुचिस्तानात पाकिस्तानी सुरक्षा दलाच्या ताफ्यावर मोठा हल्ला; २३ जवानांचा मृत्यू , BLAचा हात असल्याचा संशय

राष्ट्रपतींच्या ADCला करता येत नाही लग्न, काय असतात अटी? कशी होते निवड? १ जागा, ३० जण शॉर्टलिस्ट, १४ दिवसांची मॅरेथॉन मुलाखत

रस्त्यावर झोपून काढले दिवस, आज दीड एकरमध्ये उभा आहे आलिशान बंगला; पाहा मिथुन चक्रवर्तींच्या घराची झलक

Marathi News Live Updates : अरविंद केजरीवाल यांची 'गोवा फॉरवर्ड पार्टी' आणि 'आम आदमी पार्टी' च्या युतीची घोषणा

भांडुपमध्ये पोलिसांची मोठी कारवाई! २० लाखांचा गुटखा पानमसाला जप्त, नऊ आरोपींना अटक; पाच वाहने जप्त

SCROLL FOR NEXT