पुणे

ज्येष्ठांसह महिलांना ‘एनसीएमसी’ अनिवार्य

CD

पिंपरी, ता. ३१ ः राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना सवलतींचा लाभ घेण्यासाठी मंगळवारपासून (ता.१) नॅशनल कॉमन मोबिलिटी स्मार्ट कार्ड’ (एनसीएमसी) अनिवार्य झाले आहे. मात्र ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना त्यातून काही काळ वगळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संबंधित प्रवाशांनी एनसीएमसी कार्ड प्रवास करताना सोबत ठेवण्याचे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.
एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या ६५ ते ७५ वर्षे वयोगटासाठी ५० टक्के सवलत, तर ७५ वर्षांवरील नागरिकांना अमृत ज्येष्ठ नागरिक योजने अंतर्गत मोफत प्रवास उपलब्ध आहे. महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना तिकीटात ५० टक्के सवलत देण्यात आलेली आहे. दिव्यांगासह विविध घटकांनाही एसटीत तिकीट दरात सवलत देण्यात आलेली आहे. या सवलती अधिक सुलभ, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी एक ऑगस्टपासून एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, हे कार्ड काढण्यासाठी सर्वच एसटी आगारांत प्रवाशांची गर्दी होत होती. अनेक पात्र प्रवाशांनी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली असली तरी काही ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अद्याप प्रत्यक्ष कार्ड मिळाले नव्हते. त्यामुळे, केवळ कार्ड उपलब्ध न झाल्याने पात्र प्रवाशांना शासनाच्या सवलतीपासून वंचित राहावे लागू नये, म्हणून स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला एक सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

सकाळ इम्पॅक्ट
ज्येष्ठ नागरिकांना दिलासा
हाताच्या बोटांचे ठसे मशीनवर उमटत नसल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांची एनसीएमसी कार्डसाठी नोंदणी होत नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक एसटीच्या विविध आगारांमध्ये हेलपाटे मारत आहेत. याबाबतचे वृत्त ‘सकाळ’ने गुरुवारी (ता. २७) ‘बोटांचे ठसे उमटेना अन् नोंदणीही होईना’ या मथळ्याखाली प्रसिद्ध केले होते. यानंतर प्रशासनाने नोंदणी प्रक्रियेत येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेता एक सप्टेंबरपासून एनसीएमसी कार्ड सक्ती करण्यास काही काळ वाढवून दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्ली-महाराष्ट्रात कोट्यवधी मतदारांची नावं वगळली; SIR ड्राफ्टमध्ये तुमचं नाव आहे का? कसं चेक करायचं?

Horoscope: जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांची खास स्थिती; ‘या’ ४ राशींचं नशीब अचानक चमकणार? पैसा, करिअरमध्ये प्रगतीसह मोठ्या धनलाभाचे संकेत

जंतर-मंतर CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील FIR मागे घेण्यासाठी सरकारची सुप्रीम कोर्टात धाव; काय आहे अनुच्छेद 142?

Marathi News Live Updates : भारतातील बोगदा बचाव पथकाची नेपाळी लष्करासोबत भागीदारी

‘निपुण’ भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल! खोल समुद्रातील मोहिमा करणार, पाणबुडी बचाव क्षमतेला बळ; पाहा वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT