पुणे

एनसीएमसी रिचार्जमध्ये शुल्काचा गोंधळ

CD

एनसीएमसी रिचार्जमध्ये शुल्काचा गोंधळ
प्रवासी संभ्रमात; एजंट व वाहकाच्या रिचार्जमध्ये ११.८० रुपयांची तफावत
अहिल्यानगर, ता. २१ ः राज्य परिवहन महामंडळाच्या विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी कार्ड सक्तीचे करण्याच्या हालचाली सुरू आहेत. या कार्डच्या रिचार्जमध्ये मोठी तफावत समोर आली आहे. एकाच कार्डावर १०० रुपयांचा रिचार्ज करूनही वाहक आणि खासगी एजंटकडे वेगवेगळी रक्कम कपात होत आहे. एजंटकडे रिचार्ज केल्यानंतर कार्डवर जमा होणारी रक्कम वाहकाकडे रिचार्ज करण्यापेक्षा ११.८० रुपयांनी कमी आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
राज्य परिवहन महामंडळाने एक सप्टेंबरपासून विविध सवलतींसाठी एनसीएमसी कार्ड सक्तीचे केले होते. सुरुवातीच्या दोन दिवसांत कार्डबाबत मोठा गोंधळ निर्माण झाल्यानंतर महामंडळ आणि ई-बेक्स कंपनीने यंत्रणा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले. हे कार्ड काढण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. परंतु आता रिचार्जच्या शुल्कातील तफावतीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. एसटीच्या वाहकाकडे १०० रुपयांचा रिचार्ज केल्यास प्रवाशाच्या कार्डवर ९८.९४ रुपये जमा होतात. त्यातून ०.४० रुपये जीएसटी आणि ०.९० रुपये लागू शुल्क कपात होते. मात्र, याच १०० रुपयांचा रिचार्ज खासगी एजंटाकडे केल्यास कार्डवर केवळ ८७.१४ रुपये जमा होतात. यामध्ये १.९६ रुपये जीएसटी आणि तब्बल १०.९० रुपये सुविधा शुल्क कपात केले जाते. एकाच कार्डासाठी आणि एकाच रकमेच्या रिचार्जसाठी दोन ठिकाणी शुल्कामध्ये एवढी मोठी तफावत का, असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. १०० रुपयांच्या रिचार्जमध्ये जवळपास १२ रुपयांचा फरक पडत असल्याने ही अतिरिक्त रक्कम नेमकी कोणत्या शुल्कापोटी आकारली जाते, याची स्पष्टता होणे आवश्यक आहे.
---
एजंटही अनभिज्ञ
संबंधित कंपनीकडून मशिन घेऊन अनेक खासगी एजंट एनसीएमसी कार्ड काढणे आणि रिचार्ज करण्याचे काम करीत आहेत. मात्र, एजंटच्या मशीनवरून रिचार्ज करताना अधिक रक्कम का कपात होते, याची माहिती एजंटांनाही नसल्याचे समोर आले आहे. या कपातीमध्ये एजंटला कमिशन मिळते का, याबाबतही स्पष्टता नाही. रिचार्ज करताना संपूर्ण रक्कम कपात होत असली, तरी अतिरिक्त रकमेचा परतावा सध्या मिळत नसल्याचे एजंटांचे म्हणणे आहे. रिचार्जमधील या तफावतीमुळे प्रवासी एजंटांकडून रिचार्ज करण्याऐवजी वाहकांकडे रिचार्ज करण्यास प्राधान्य देत आहेत.
-------
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी प्रशासनाने सर्व बसस्थानके आणि आगारांवर अतिरिक्त वाहकांची व्यवस्था केली आहे. वाहकाकडे किंवा एजंटाकडे ५० रुपयांच्या पटीत रिचार्ज करता येतो. मात्र, वाहकाच्या मशिनवर ‘ॲप्लिकेबल फी’, तर एजंटच्या मशिनवर ‘कनव्हिनियन्स फी’ असा वेगळा पर्याय असल्याने शुल्कात फरक पडत आहे.
- सचिन अस्वर, एजंट, अहिल्यानगर
---------
एनसीएमसी कार्डच्या सक्तीमुळे आधीच प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण असताना आता रिचार्ज शुल्कातील तफावतीने त्यात भर पडली आहे. महामंडळ व संबंधित कंपनीने या शुल्करचनेबाबत स्पष्ट माहिती जाहीर करून प्रवाशांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याची गरज आहे.
- सुजाता पवार, प्रवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भूकच गेली! मुंबईत प्रसिद्ध फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवणाच्या टेबलवर झुरळ, डॉक्टरने VIDEO शेअर करत तुकाराम मुंढेंना केलं टॅग

Palghar News : गणेश विसर्जनावेळी पालघरच्या सूर्या नदीत दुर्घटना; १७ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू, तिघांना वाचवण्यात यश

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

Nirgudsar News : कृषीपंपांच्या केबलवर चोरट्यांचा डल्ला

SCROLL FOR NEXT