NCP against Chhagan Bhujbal over criticize sharad pawar politics pune Sakal
पुणे

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे आंदोलन

शरद पवार यांनी केलेली मदत व मार्गदर्शन विसरून भुजबळ यांनी राजकारणातील विकृतीचे दर्शन दिले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या विधानाबद्दल छगन भुजबळ यांचा पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून निषेध करण्यात आला. ‘छगन भुजबळ यांचा निषेध असो’, ‘बेइमान बेइमान, छगन भुजबळ बेइमान’ अशा घोषणांनी संपूर्ण शनिपार परिसरात सोमवारी (ता. २८) जोरदार आंदोलन करण्यात आले.

शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे, मृणालिनी वाणी, गणेश नलावडे, सुषमा सातपुते, दीपक जगताप, भूषण बधे, सारिका पारेख, अप्पा जाधव, पायल चव्हाण आणि राजेंद्र आलमखाणे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते. जगताप म्हणाले, ‘‘छगन भुजबळ यांनी वाचाळगिरी करत आपण किती चांगल्या स्वरूपाचे गद्दार आहोत, याचे प्रदर्शन बीड येथे झालेल्या जाहीर सभेत घडवले.

शरद पवार यांनी केलेली मदत व मार्गदर्शन विसरून भुजबळ यांनी राजकारणातील विकृतीचे दर्शन दिले आहे. भविष्यात जर त्यांनी पुन्हा बेताल वक्तव्य केली तर पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांचा योग्य समाचार घेणार.’’ शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या विधानाबद्दल छगन भुजबळ यांचा पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून सोमवारी निषेध करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT