Sharad Pawar Latest News  
पुणे

Ajit Pawar News : 'दरवेळेसच तुम्ही म्हणाल तेच बरोबर, असे कसे चालेल...'; अजितदादांचा शरद पवारांना खडा सवाल 

Latest Marathi Political News : बारामतीत आजी माजी पदाधिका-यांच्या मेळाव्यात अजित पवार बोलत होते.

- मिलिंद संगई

बारामती : मी पक्ष चोरला असा माझ्यावर आरोप केला जातो, पण मी पक्ष चोरला नाही. पुढच्या पिढीने पक्षाचे काम हातात घेतले याचा अर्थ त्यांनी पक्ष चोरला असं होत नाही. आम्हीही पक्षासाठी योगदान दिलेले आहे. आज 80 टक्के आमदार माझ्यासोबत येतात, आमच्या विचाराची भूमिका घेतात, याचा अर्थ कुठेतरी काहीतरी योग्य घडत असेल, म्हणूनच ते आमदार येतात ना...सतत तुम्ही म्हणाल तेच बरोबर असे दरवेळेस कसे चालेल, असा खडा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नामोल्लेख टाळून ज्येष्ठ नेते शरद पवार यांना केला. बारामतीत आजी माजी पदाधिका-यांच्या मेळाव्यात अजित पवार बोलत होते.

ते म्हणाले, मी दमदाटी करतो असा माझ्यावर आरोप केला जातो, पण मी कधीच दम दिला नाही. ज्यांच्यावर माझा हक्क आहे, त्यांच्याकडे मी काही मागितले, विनंती केली तर त्याला दम म्हणता येणार नाही. आज तुम्हाला जे भावनिक करत आहेत, त्यांच्या हातात केंद्रातील काहीच नसेल तर ते काय तुमचा विकास करू शकणार असा सवाल त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार व सुप्रिया सुळे यांचा नामोल्लेख टाळून केला.

जानकरांवरही गळ टाकला होता....

शरद पवार यांचा नामोल्लेख टाळून ते म्हणाले, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्यावरही त्यांनी गळ टाकला होता. पण त्यांच्या गळाला मासा लागण्याच्या आधीच आम्ही मासाच बाजूला नेला होता, त्यामुळे त्यांच्या गळ्याला हा मासा लागू शकला नाही. मला त्यांना सांगायचं आहे की चार दिवस जसे सासूचे असतात, तसेच चार दिवस सुनेचे असतात, त्यामुळे आता सासू-सास-यांनी घरी बसले पाहिजे आणि सुनेला काम करू दिले पाहिजे.

...तर माझीही साथ मिळणार नाही....

विकासाच्या कामाचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर भाषण संपवताना अजित पवार यांनी पुन्हा एकदा मतदारांना साद घातली. ते म्हणाले या निवडणुकीत तुम्ही मला साथ दिली नाही तर मीही तुम्हाला साथ देणार नाही, याची सर्वांनी जाणीव ठेवावी. कारण एवढे करून जर पालथ्या घडयावर पाणी असेल तर त्याचा काही उपयोग नाही. त्यांच्या या वाक्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच वादा अजित दादाच्या घोषणा दिल्या.

बारामती विधानसभा मतदारसंघात मतदारांनी काय निर्णय घ्यायचा हे त्यांनी ठरवायचे आहे, मात्र इतर पाचही विधानसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार आज आघाडीवर राहणार आहे. हर्षवर्धन पाटील, दत्तात्रय भरणे, दशरथ माने, विजय शिवतारे, दिगंबर दुर्गाडे, दादा जाधवराव, बाबा जाधवराव, जालिंदर कामठे, अशोक टेकवडे, राहुल कुल, वासुदेव काळे, रमेश थोरात यांच्यासह असंख्य नेतेमंडळी व पदाधिकारी मनापासून महायुतीच्या उमेदवाराचे काम करीत असल्याचे असे अजित पवार यांनी नमूद केले. जास्त नाही पण पुढची किमान दहा वर्षे तरी मी तुमचं काम खंबीरपणे करू शकतो त्यामुळे कोणाला साथ द्यायची याचा निर्णय बारामतीकरांनी करायचा आहे, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Ports Bill: समुद्री व्यापाराला बूस्ट! भारताचं ‘मेगा पोर्ट’ महाराष्ट्रात उभं राहणार, तब्बल 'इतक्या' कोटींचा प्रकल्प

Network Services Down: कॉल नाही, इंटरनेट गायब...; Airtel, Jio, Vi सेवा ठप्प, मोबाईल नेटवर्क डाऊन!

Pune News: नऊ वर्षांच्या कालखंडानंतर पुन्हा नगरपरिषद निवडणूक होणार

Tiruchi N. Siva: उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक नाही होणार बिनविरोध?, ‘I.N.D.I.A’ आघाडीकडून तिरुची शिवा उमेदवारीसाठी चर्चेत!

Latest Marathi News Live Updates : निफाड प्रांत कार्यालयावर पुढील आठवड्यात मोर्चा धडकणार

SCROLL FOR NEXT