राष्ट्रवादीचे बॅनर
राष्ट्रवादीचे बॅनर sakal
पुणे

पुण्यात नितीन गडकरींच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे बॅनर

अशोक गव्हाणे

कात्रज : कात्रज चौकातील सहा पदरी उड्डाणपुलाचे भूमिपूजन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज (ता. २४) झाले. त्यानिमित्त ते कात्रजमध्ये होते, त्यावेळी त्यांच्या स्वागताचे बॅनर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कात्रज परिसरात लावण्यात आले होते. याची चर्चा परिसरात मोठ्या प्रमाणावर रंगली. हे बॅनर राष्ट्रवादीचे स्थानिक नगरसेवक प्रकाश कदम यांच्याकडून लावण्यात आले होते.

कार्यक्रमादरम्यान, राष्ट्रवादीचे नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही नितीन गडकरींच्या कामाचा कौतुक केले. केंद्र सरकारमध्ये सर्वात लोकप्रिय मंत्री हे नितीन गडकरी आहेत. ते कुठल्याही पक्षाच्या व्यक्तीसोबत सहकार्याची भूमिका असते. आम्ही भारतात सगळ्यात चांगला मंत्री म्हणून गडकरी यांना पसंती देतो. राजकारणात नेता कसा असावा? याचे उदाहरण म्हणजे नितीन गडकरी आहेत असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

तसेच अजित पवार यांच्याकडूनही नितीन गडकरी यांचे कौतुक करण्यात आले. अजित पवार म्हणाले, नितीन गडकरी यांच्या माध्यमातून अनेक कामे मार्गी लागत आहेत. महाराष्ट्रातील कामासाठी आपलेपणाने केंद्रातील कुठल्या मंत्र्याकडे जायचे तर ते गडकरी यांच्याकडे गेल्यावर काम होते असे अनेक खासदार सांगतात. जसे पूर्वीच्या काळात यशवंतराव चव्हाण दिल्लीत असताना त्यानंतर शरद पवारसाहेब दिल्लीत असताना महाराष्ट्राला फायदा होत होता अगदी त्याच पद्धतीने महाराष्ट्राला गडकरी साहेबांची मदत महाराष्ट्राला होत असल्याने आनंद वाटतो. तसेच चांगली कामे करत असताना आणि काम वेळेत कसे पूर्ण होईल याचा विचार सर्वांनी केला पाहिजे. त्याचबरोबर गडकरी यांचा फायदा संपूर्ण महाराष्ट्राला कसा होईल याचा विचार आम्ही करू, असेही पवार म्हणाले.

दरम्यान यावेळी कार्यक्रमाला विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, मुक्ता टिळक, महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार योगेश टिळेकर, सभागृहनेते गणेश बीडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, विभागीय आयुक्त सौरभ राव, महापालिका आयुक्त विक्रमकुमार आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kyrgyzstan Violence : किर्गिस्थान हिंसाचार! संभाजीनगर, धाराशिव, बीडचे ५०० विद्यार्थी अडकले; होणार ऑनलाईन परीक्षा

Hit & Run Case : जेव्हा सलमानवर दाखल झाली होती हिट अँड रन केस ; पुण्यातील प्रकरणानंतर पुन्हा 'ती' घटना चर्चेत

Pune Porsche Accident: आम्ही आमची मुलं मोठी होत नाहीत पर्यंत...', पुणे अपघातात मुलगी गमावल्यानंतर वडिलांचा राग अनावर

Latest Marathi News Live Update: रामेश्वरम् कॅफे स्फोटप्रकरणी NIAचे देशभरात छापे

Career Options for Arts Stream: कला शाखेचे विद्यार्थी या क्षेत्रात करू शकतात करिअर, दरमहा होईल लाखोंची कमाई

SCROLL FOR NEXT