NCP city president Prashant Jagtap esakal
पुणे

'ही तर नव्या आयुष्याची सुरुवात'; NCP शहराध्यक्षानं दिली आपल्या आजाराविषयी माहिती

सकाळ डिजिटल टीम

माझ्या आजाराची माहिती कोणालाच कळाली नव्हती; पण..

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी आपल्या आजाराबद्दल फेसबुक पोस्टव्दारे माहिती दिलीय. काही दिवसांपूर्वी त्यांना Paralysis चा अटॅक येऊन गेल्याची माहिती जगतापांनी फेसबुकव्दारे सांगितलीय.

जगताप पुढं सांगतात, माझ्या आजाराची माहिती कोणालाच कळाली नव्हती. मी अनेकांना भेटलो, पत्रकारांना भेटलो, कार्यकर्त्यांनाही भेटलो; पण त्यांनाही माझ्या चेहऱ्यात कोणताही बदल जाणवला नाही. मी जेव्हा माझा एक फोटो पाहिला, तेव्हा मला काहीतरी झालंय असं लक्षात आलं. म्हणून, मी डॉक्टरांना भेटायला गेलो असता, त्यांनी मला Paralysis चा झटका येऊन गेल्याचं सांगितलं.'

माझ्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला Paralysis चा झटका येऊन गेल्याची माहिती जगताप यांनी फेसबुकवर व्हिडिओ अपलोड करुन दिलीय. ही नव्या आयुष्याची सुरुवात आहे, असंही त्यांनी म्हटलंय. त्यांच्या कार्यकर्त्यांनी परमेश्वराकडं प्रार्थना करत साहेबांना लवकर बरं करावं, अशी मागणी केलीय. तर, काहींनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर कमेंट करत काळजी घेण्याची विनंती केलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT