पुणे

''राष्ट्रवादी पश्चिम महाराष्ट्रातील छोटासा पक्ष''

सागर आव्हाड

पुणे : महापालिकेच्या निवडणुकीत आमचं प्राध्यान राष्ट्रवादीपेक्षा शिवसेनेला राहील. राष्ट्रवादी पश्चिम महाराष्ट्रातील एक छोटासा पक्ष आहे, तो काही अखिल भारतीय पक्ष नाही. अशी माहिती भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी दिली. शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन झालं. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी करत कोरोनाच्या नियमांचं मोठ्या प्रमाणावर उल्लंघन केलं होतं. दरम्यान या मुद्द्यावरुन गिरीश बापट यांनी अजित पवारांवर निशाना साधत ''दादा, शरद पवारांचे ऐकत नाही हे माहिती होतं, पण आता त्यांचे(अजित पवार) कार्यकर्तेही ऐकत नाही हे माहिती झालं. त्यामुळे यातच सगळी ग्यानबाची मेक आहे.'' अशा शब्दात टोला लगावला.

आतापर्यंत अनेक नेत्यांनी ईडीच्या चौकशींना समारे जावे लागते. त्यावरुन भाजपवर केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर केला जात असल्याचा आरोप केला जातो. त्याबाबत विचारले असता,''कोणतीही कारवाई भाजप करत नाही. तपास यंत्रणा त्या कारवाई करत असतात.'' असे सांगून गिरीश बापट यांनी हे आरोप नाकारले. तसेच,''भाजप गरीब पार्टी आहे, ती कारवाई नाही तर, लोकांना मदत करणारी पार्टी आहे.'' असे स्पष्टीकरणही त्यांनी यावेळी बोलताना दिले.

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी लिहिलेले पत्र मुख्यमंत्र्यांना पत्र लिहले असून ''युती तोडल्याने माझ्यासारख्या नेत्याच्या कुटुंबाला त्रास सहन करावा लागतो, हे पत्रात नमूद करून भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकारवर सरनाईकांनी दोषारोपण केले आहेच; शिवाय कॉंग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची कामे होत असून ते शिवसेनेला फोडत असल्याचा आरोपही केला आहे. दरम्यान, याबाबत गिरीश बापट यांना विचारले असता ते म्हणाले, '' भीतीच्या पलीकडे आणि सुरक्षेच्या दृष्टीने प्रताप सरनाईक यांची बोलकी प्रतिक्रिया देते आहे. भविष्यात काळात अशा गोष्टी होऊ शकतात.''

दरम्यान, सरनाईकांनी मुख्यमत्री उद्धव ठाकरे यांना भाजपसोबत हातमिळवणी करण्याचा सल्लाही या पत्रातून दिला आहे. याबाबत बोलताना बापट यांनी ''अनैसर्गिक लोकांमूळे आमची तुटली होती, भविष्यात युती होऊ शकते, आम्हाला त्याचा आनंद होईल. नाईक आत्ता जे बोलले ते भाजप नेते महाविकास आघाडी होत असतांना बोलत होते. त्यांचे नेते सकारात्मक विचार करतील. आता निर्णय उद्धव ठाकरे यांना घ्यायचाय.'' असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Inflation: पाकिस्तान संकटात! अन्न टंचाई, डिझेल-LPG महागाईने जनतेचं कंबरडं मोडलं

LPG Crisis : एलपीजी संकटादरम्यान सरकारने आखली मोठी रणनीती, सामान्यांना दिलासा; गॅस सिलिंडर अन् PNG बाबत महत्त्वाची अपडेट समोर

Horoscope : उद्या अश्विनी मेषेर्कचा दुर्लभ योग! मेषसह 'या' 4 राशींना आर्थिक लाभ संभवतो; महिन्याभरात होईल भरभराट, नात्यात कलाटणीचा क्षण

Bihar Politics: ''बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे दोन नेते ठरवणार'', प्रशांत किशोर काय बोलले?

Latest Marathi News Live Update: रत्नागिरीत बंदुकीने गोळ्या झाडून घेत युवकाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT