पुणे

हेड शरद पवारांचे खासदार पंतप्रधानांच्या भेटीला

CD

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. १० : ‘राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षा’च्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) कथित सहभागाबद्दल अटकळबाजी सुरू असतानाच या पक्षाच्या आठ खासदारांनी आज संसद भवनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन भेट घेतली. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील खासदारांच्या या शिष्टमंडळाने राज्यातील प्रश्नांबाबत आणि मतदारसंघांतील विकासकामांबाबत पंतप्रधानांशी चर्चा केल्याचे सांगण्यात आले.
लोकसभा मतदारसंघाच्या घटनादुरुस्ती विधेयकासाठी सरकारकडून संसदेतील मतांची जुळवाजुळव सुरू असताना त्या पार्श्वभूमीवर झालेली राजकीय भेट महत्त्वाची मानली जाते. पंतप्रधान मोदींनी सुप्रिया सुळे यांच्याकडे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारणा केली. त्यानंतर खासदारांनी आपआपल्या मतदारसंघांतील समस्यांकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधले. काही भागांतील पूरस्थिती, काही ठिकाणी पावसाचा अभाव, पिकांच्या किमती तसेच विविध विकासकामांबाबतच्या मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. पंतप्रधानांनी खासदारांचे म्हणणे ऐकून घेत संबंधित प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्याचे समजते. या भेटीत महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणीही खासदारांकडून करण्यात आली.


- या भेटीत खासदार बजरंग सोनवणे (बीड) यांनी उजनी धरणातून बीड जिल्ह्याला पाणी सोडले जावी, अशी मागणी केली. भिवंडीचे खासदार सुरेश ऊर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी नवी मुंबई विमानतळाला दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा आग्रह धरला. शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला गती मिळावी, अशी मागणी केली. चंद्रभागा नदीतील प्रदूषणाकडेही पंतप्रधानांचे लक्ष वेधण्यात आल्याचे समजते.

- मागील काही दिवसांमध्ये दोन्ही ‘राष्ट्रवादी’च्या नेत्यांच्या भाजपच्या नेत्यांशी भेटीगाठी वाढत चालल्या आहेत. स्वतः ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधानांची भेट घेतली होती. त्यानंतर जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनीही मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली होती. या भेटीगाठींमुळे ‘एनडीए’च्या विस्ताराबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asangaon-Kasara Rail Block : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! कसारा रेल्वेमार्गावर 7 ते 18 ऑक्टोबरदरम्यान मोठा मेगाब्लॉक; आसनगाव-कसारा लोकल सेवा बंद

IND vs PAK Final: वैभव सूर्यवंशीला स्वस्तात OUT केलं अन् सैम अयूबने केला विचित्र जल्लोष! VIDEO व्हायरल; भारतीय चाहते संतापले? नेमकं काय केलं?

Nagpur Garage Fire: नोकरीवरून काढल्याच्या रागातून गॅरेजला आग!; २० दुचाकी जळाल्या; माजी कर्मचाऱ्यावर संशय, सीसीटीव्हीच्या आधारे शोध सुरू

Latest Marathi News Live Update : विरारमध्ये उद्घाटन कार्यक्रमावेळी भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

वीर पहाडियाचा रोमँटिक अंदाज, आफिया सय्यदचं पदार्पण; ‘प्रेम कीटाणू’ ठरतोय तरुणाईचा सिनेमा?

SCROLL FOR NEXT