Ajit Pawar 
पुणे

Loksabha 2019 : बारामतीतून सुप्रिया सुळे मताधिक्याने विजयी होतील : अजित पवार

मिलिंद संगई

बारामती : राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी व मित्र पक्षांच्या आघाडीला चांगले यश मिळेल, मतदारांचा कौल आघाडीच्या बाजूने असून बारामतीतूनही सुप्रिया सुळे मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

बारामती तालुक्यातील काटेवाडी येथे मतदान केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा विश्वास व्यक्त केला. भाजपने गेल्या पाच वर्षात केलेल्या कामावर त्यांचा विश्वासच होता, तर अनेक मतदारसंघात त्यांनी उमेदवार का बदलले असा सवाल त्यांनी केला. त्यांच्या कामगिरीवर विश्वास होता तर मग त्यांनी राष्ट्रवादी व काँग्रेसकडून उमेदवार आयात करण्याची वेळ त्यांच्यावर का आली, इतक्या फोडाफोडीचे व खालच्या पातळीवरील राजकारणाची अपेक्षा भाजपकडून निश्चित नव्हती पण त्यांनी तस केल, असे ते म्हणाले. 

मोदींनी या पूर्वीची निवडणूक विकासाच्या मुद्यावर लढविली होती, यंदा राज्यातील कोणत्याच सभेत त्यांनी विकासाचा मुद्दा काढलाच नाही, केवळ त्यांनी गांधी नेहरु व पवार कुटुंबियांवर टीकाटीपण्णी केली. आम्ही मात्र देशाच्या विकासासाठी निवडणूक लढविण्यावर भर दिला आहे. भाजपने जाहिरनाम्यातील एकही गोष्ट पूर्ण केली नाही आणि त्यावर पंतप्रधान किंवा त्यांची टीम काहीच बोलायला तयार नाही, त्या मुळे विरोधक म्हणून आम्ही भूमिका घेतली. भाजपच्या कितीतरी उमेदवारांनी आक्षेपार्ह विधाने केली, मारामारी झाली, काहींच्या डोळ्यात अश्रू आले तर काहींनी स्वताः देव समजून घेतले. 

शेतक-यांचे प्रश्न, दुष्काळ, टंचाई, हमीभाव इतर विकासाच्या मुद्यावर ते काहीच बोलले नाहीत हे दुर्देवी आहे. 
दोन टप्प्यातील मतदानानंतर राज्यातील हवा बदलली आहे, असे दिसते आहे, आम्हाला मताधिक्याचा विश्वास आहे, आमचे ऐक्य चांगले असल्याने यंदा यश चांगले मिळेल, काही ठिकाणी उशीर लागला आहे मात्र तरीही सर्वांनी एकदिलाने काम केलेले असल्याने आम्ही यंदा चांगले यश मिळवू, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates: पाषाण-बावधन रस्त्यावर भरधाव कारची धडक, सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू

IND vs AFG: १५ वर्षांच्या वैभव सूर्यंवशीसमोर बुमराहचा यॉर्कर अन् बाऊन्सरचा मारा! सरावावेळी नेमकं काय घडलं?

Civic Body Clash: स्वच्छता साहित्य डीबीटीने देणे अशक्य; महापालिका प्रशासनाचा फेरप्रस्ताव, स्थायी समितीशी संघर्षाची शक्यता

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

SCROLL FOR NEXT