Ajit Pawar Sakal
पुणे

नारायण राणे यांच्या टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

कार्तिक पुजारी

पुणे- अजित पवार अज्ञानी आहेत, त्यांनी स्वत:च्या खात्याचं पाहावं अशी बोचरी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली होती. यावर पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला या गोष्टीची चर्चा करायची नाही. त्याचं त्याला लखलाभ. ते केंद्रात मंत्री आहेत, त्यांनी त्यांचं काम करावं, आम्ही आमच्या राज्यातील काम करत राहू, असं ते म्हणाले आहेत. अजित पवारांच्या नेतृत्त्वातील पुण्यातील बैठक संपली आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली.

रुग्णसंख्या वाढत असल्याने केंद्र सरकार राज्याला काळजी घेण्यास सांगत आहे. पण, दुसरीकडे चार मंत्र्यांना जन आशीर्वाद यात्रा काढण्यात सांगितलंय. अशा यात्रांना गर्दी होत आहे. त्यामुळे अशा ठिकाणी कोरोना वाढण्याचा धोका आहे. या ठिकाणी रुग्ण वाढू नये अशी आमची आशा आहे, पण रुग्ण वाढले तर त्याला जबाबदार कोण याचा विचार केंद्र सरकारने करायला हवा, असं अजित पवार म्हणाले आहेत.

मला अनिल देशमुखांबाबत रिपोर्ट मिळत नाही. तोपर्यंत मी यावर बोलणार नाही, अनेक चौकशा होत असतात. त्यावेळी सगळ्यानी चौकशीसाठी मदत करत असतात, त्यामुळे यावर बोलणार नाही, असं अजित पवार म्हणाले. जिथं राजकारण करायच आहे, तिकडे सगळे राजकारण करू. पण जिथं जनतेचा प्रश्न तिकडे सर्व राजकिय पक्षानी एकत्र काम केलं पाहिजे त्यामुळे सण साजरे करताना काळजी घ्यावी, असं आवाहन पवारांनी केलं.

दरम्यान, पुण्यात पीएमआरडी बाबत बैठक पार पडली. यावेळी पालकमंत्री म्हणाले की, ''आज खासदार आमदारांना एक ड्राफ्ट दाखवला. अनेकांनी सूचना दिल्या. एक बैठक मुख्यमंत्री स्तरावर होणार आहे. त्यानंतर त्यातील अनेक मागण्या बाबत चर्चा होईल. पुणे आजूबाजूचा परिसर वाढतच आहे. त्यामुळं भविष्यात जर नवीन महापालिका करायची झाली तर त्याबाबत नियोजन करायच त्याबाबत चर्चा झाली.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT