Ajit Pawar 
पुणे

Video : अजित पवार म्हणतात, चिंता नको; देवेंद्रसोबत हवापाण्याच्या गप्पा मारल्या

मिलिंद संगई

बारामती : मी आणि देवेंद्र फ़डणवीस शेजारी बसलो म्हणजे लगेच काहीतरी सुरु झालय अस समजण्याच कारण नाही, आम्ही शेजारी बसून हवापाण्याच्याच गप्पा मारल्यात अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फडणवीस व त्यांच्या भेटीचे वर्णन केले. हे वर्णन करताना त्यांचा मूड मिश्कील शैलीचा होता. 

पवार म्हणाले, ''राजकीय व्यक्ती कधी कायमच्या एकमेकांच्या दुश्मन नसतात, सत्ताधारी किंवा विरोधक एकत्र  आल्यानंतर एकमेकांना नमस्कार होतो, एकत्र बसतात, चर्चा होती... यात दुसर काहीही नव्हत. संजय शिंदे यांनी आग्रहाने मला व इतरांना बोलावल होत, म्हणून त्या लग्नाला आम्ही गेलो होतो, खुर्च्या ठेवताना अशा ठेवल्या की माझी व देवेंद्र यांची खुर्ची शेजारी शेजारी आली, इतकच...त्या मुळे शेजारी बसल्यावर आम्ही थोडीफार इकडची तिकडची चर्चा केली...कस काय पाऊसपाणी वैगेरे...

देवेंद्रच्या मुलाखतीवर बोलणार नाही
देवेंद्र फडणवीस यांच्या मुलाखतीवर काहीही बोलणार नाही, मला बारामतीची प्रचंड कामे आहेत, त्यांची कामे करणे हेच माझे एकमेव काम आहे, तेच मी करत राहणार आहे, अशा शब्दात त्यांनी फडणवीस यांच्या मुलाखतीवर उत्तर देण्यास स्पष्टपणे नकार दिला. खातेवाटपाबाबत मुख्यमंत्रीच काय ते अधिक विस्ताराने सांगू शकतील असेही पवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alephata News : ‘जीव देऊ, पण वडिलोपार्जित जमीन नाही’; कल्याण-लातूर महामार्गाला माळवाडी ग्रामस्थांचा विरोध, शासन-शेतकरी संघर्ष पेटण्याची चिन्हे

9 September 2026 Numerology Prediction : 9 सप्टेंबरचा दुर्मिळ योग! सूर्य, मंगळ अन् बुधाच्या कृपेने 'या' 3 मूलांकांना मिळणार बंपर पैसा, नव्या संधींचे मार्ग होणार खुले?

मानसवेध : मानसिक ताकद वाढविण्यासाठी

Soyabean Medu Vada: घरात उडीद डाळ नाही? टेन्शन नको! 10 मिनिटांत बनवा सोयाबीनपासून मेदू वडा; जाणून घ्या रेसिपी

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

SCROLL FOR NEXT