Supriya Sule Esakal
पुणे

Supriya Sule: नवले पुलाजवळील अपघाताच्या घटनेबाबत नितीन गडकरींसोबत चर्चा करणार

ब्रेक फेल झाल्यामुळे ट्रकने दिली ट्रॅव्हल्सला धडक

अंकिता खाणे (Ankita Khane)

कोल्हापूरहून मुंबईला जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल बस आणि साखर घेऊन जाणाऱ्या ट्रकचा मध्यरात्री भीषण अपघात झाला. या अपघातात चार प्रवाशांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर 22 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात अत्यंत भीषण होता.

अपघातात ट्रकच्या केबिनचा चक्काचूर झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर चारजणांचे मृतदेहही ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

दरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी घटना स्थळाला भेट दिली. त्यानंतर जखमी प्रवाश्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यानंतर या घटना वारंवार घडत आहेत. याबद्दल उपाययोजना करणे गरजेचे असल्याचंही त्यांनी म्हंटलं आहे. तर “नवले पूल येथील अपघाताच्या घटनेबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशीदेखील चर्चा करणार” असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे.

कोल्हापूरहुन मुंबईकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसचा आणि साखर घेऊन जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला. रात्री 2:15 च्या सुमारास हा अपघात झाला आहे. सर्व प्रवासी गाढ झोपेत असतानाच ही घटना घडली. पुण्यातील पुणे-बेंगलोर महामार्गावरील स्वामी नारायण मंदिराजवळ हा भीषण अपघात झाला. यामध्ये 22 जण जखमी झाल्याची माहिती आहे. तर यामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. या अपघाताची माहिती मिळताच कात्रज पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले.

मिळालेल्या माहितीनुसार ट्रॅव्हल्समध्ये एकूण 21 प्रवासी, 1 ड्राइवर आणि एक क्लिनर असे एकूण 23 जण होते. साखरेच्या ट्रकमध्ये एक ड्राइवर, 2 मालक असे एकूण 3 जण होते. त्यापैकी ससून हॉस्पिटल येथे 05, चव्हाण हॉस्पिटल येथे 09 व नवले हॉस्पिटल येथे 06, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे 02 असे एकूण 22 जण उपचार घेत आहेत. मृत झालेल्या 4 पैकी 3 जणाची ओळख पटली आहे. मृत झालेल्या 4 पैकी 3 जण ही कोल्हापूरचे रहिवासी आहेत. मृतांमध्ये एका लहान बाळाचा देखील समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : राज्यात विजांसह पावसाची शक्यता; पुढील ५ दिवसांचा हवामान अंदाज

Parag Shah: ३३८३ कोटींचे आमदार रस्त्यावर उतरले; भिक्षेकऱ्याचा वेश करून मागितली भिक्षा, नेमकं कारण काय?

IMD Weather Update: मॉन्सून शनिवारपासून परतीच्या मार्गावर : ‘आयएमडी’ पश्चिम राजस्थानातून घेणार माघार

Maharashtra Police Recruitment: पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! राज्यात ८१०० पदांसाठी नववर्षात भरती; सोलापुरात ११७ जागा

जीवनमान-जीवनभान : व्यायामाने जपूया मानसिक आरोग्य

SCROLL FOR NEXT