Vaishali Nagawade NCP Sakal
पुणे

राष्ट्रवादीच्या वैशाली नागवडेंना मारहाण; भाजपा नेत्यावर विनयभंगाचा गुन्हा

स्मृती इराणी पुण्यात कार्यक्रमासाठी आलेल्या असताना राष्ट्रवादी आणि भाजपाचे कार्यकर्ते आमनेसामने आले आणि गोंधळ निर्माण झाला.

सकाळ डिजिटल टीम

केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेत्या स्मृती इराणी काल पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिरात एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. या कार्यक्रमादरम्यान भाजपा आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार राडा घातला. या गोंधळात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पुणे विभागीय अध्यक्षा वैशाली नागवडे यांना मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला होता. या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वैशाली नागवडेंसह राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना भाजपाच्या काही पुरुष नेत्यांकडून मारहाण केल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्याआधारे पोलिसांनी तिघांवर मारहाण, विनयभंग आणि कलम ५०४, ५०६ आणि ३४ नुसार कारवाई करण्यात येत आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या जीवनावर आधारित पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम काल पुण्यात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी स्मृती इराणी प्रमुख पाहुण्या होत्या. या कार्यक्रमात इराणी बोलायला उठल्या तेव्हा, जोरदार घोषणाबाजी झाली. त्यानंतर राष्ट्रवादी आणि भाजपाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या वैशाली नागवडे यांना भाजपाच्या कार्यकर्त्याने मारहाण केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : देशातील पहिल्या पर्यटन पाणबुडीच्या बांधणीला सुरुवात; २०२७ मध्ये प्रकल्प पूर्ण होणार

Nagpur Raid: नागपूरमध्ये कामोत्तेजना वाढवणारं बोगस औषध उजेडात! 'या' कॅप्सुलचा पर्दाफाश; अन्न व औषध प्रशासनाची रेड

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सीसीटीव्ही, डीएनए पुराव्यांवरून आरोपीचा खोटेपणा उघड; २५ जूनला निकाल

Strait of Hormuz Closed: पुन्हा मध्यपूर्वेत युद्धाची चिन्हे? होर्मुझ सामुद्रधुनी बंद; इराणचा मोठा निर्णय, दिला मोठा इशारा

IND vs AFG: यशस्वी जैस्वालचे खणखणीत शतक अन् मग विजयी षटकार... भारताचा अफगाणिस्तानला व्हाईटवॉश

SCROLL FOR NEXT