राष्ट्रवादीच्या नेत्यांची
अमित शहांशी भेट
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. २ : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहा ज्येष्ठ नेत्यांनी रविवारी मध्यरात्री दिल्लीचा धावता दौरा करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घेतलेली भेट चर्चेचा विषय ठरली. या भेटीचा तपशील समोर आला नाही. या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उपस्थिती नसल्याने मतभेदाबाबत तर्कवितर्क लावण्यात येत असताना या चर्चांचे पक्षाकडून अधिकृतपणे खंडन करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे या सहा नेत्यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली असून या निकालांनंतर प्रफुल्ल पटेल यांनी पक्षात आत्मपरीक्षणाची आणि तसेच संघटनात्मक सुधारणेची जाहीर गरज बोलून दाखविली होती.
या घटनाक्रमात पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची गृहमंत्र्यांशी दिल्लीत भेट झाली आणि या भेटीनंतर सर्व नेते लगेच महाराष्ट्रात रवाना झाले. विशेष म्हणजे या भेटीच्या वेळी पक्षप्रमुख सुनेत्रा पवार तसेच खासदार पार्थ पवार ज्येष्ठ नेत्यांसोबत उपस्थित नसल्याने विविध तर्कवितर्क लढविले जात आहेत. त्यावर पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी स्पष्टीकरण दिले. काही घटकांकडून या भेटीला अनावश्यक राजकीय रंग देण्याचा आणि पक्षात मतभेद असल्याचे दर्शविण्याचा खोडसाळ प्रयत्न सुरू असल्याची नाराजी उमेश पाटील यांनी व्यक्त केली. तसेच ही भेट पूर्वनियोजित असल्याचे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.