mp amol kolhe  
पुणे

Onion Export : 'मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याचं पाप केलं'; कांदाप्रश्नी अमोल कोल्हे आक्रमक

रोहित कणसे

कांदा निर्यात शुल्क धोरणाविरोधात राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळात आहेत. केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्क 40 टक्के वाढविल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी संताप व्यक्त करत आहेत. यादरम्यान सरकारच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली जुन्नर तालुक्यातील आळेफाटा चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

दरम्यान या आंदोलनावेळी माध्यमांशी बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की, सातत्याने शेतकरी विरोधी धोरणे राबवली जात आहेत. कांदा उत्पादकांना चार पैसे मिळतील अशी अशा निर्माण झाली असताना. सहा सात महिने पुरेल इतका कांदा देशात उपलब्ध असताना मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याचं पाप केलं आहे. निर्यात शुल्क लादणं ही अघोषित निर्यातबंदी आहे. असेच नेपाळमधून टोमॅटो आयात करून त्याचे दर पाडले आता कांद्याचे दर देखील असेच पाडण्याचं काम सरकार करत असल्याचे अमोल कोल्हे म्हणाले.

कांद्याला तीन-चार वर्षांपासून कांद्याला भाव मिळत नसताना सरकार शेतकऱ्यांच्या मदतीला पुढे आलं नाही आणि आता मात्र शेतकऱ्याच्या मुळावर उठणाऱ्या सरकारविरोधात आम्ही रास्ता रोको करत आहोत असेही कोल्हे यावेळी म्हणाले.

केंद्रीय नेत्यांचं स्वागत करणाऱ्या महाराष्ट्रातील नेत्यांना विनंती आहे की, जोपर्यंत कांद्यावरील निर्यातशुल्क मागे घेतलं जात नाही, आणि कांद्याला हमी भाव मिळत नाही तोपर्यंत केंद्रातील जो नेता महाराष्ट्रात येईल त्याची कांद्याची माळ घालून स्वागत करावं जेणेकरून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं दुखः केंद्रातील भाजपच्या नेत्यांना समजेल असेही अमोल कोल्हे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump : दिवाळीआधी डोनाल्ड ट्रम्प यांचं भारताला खास गिफ्ट; 'या' क्षेत्रातील कंपन्यांना होणार फायदा

Narak Chaturdashi 2025 Zodiac Prediction: नरक चतुर्दशीच्या दिवशी कन्यासह 'या' दोन राशींचा सुरू होईल गोल्डन टाइम

Latest Marathi News Live Update : कोंढव्यात राज्य दहशतवाद विरोधी पथकाने छापे, संशयितांना घेतलं ताब्यात

Pakistan Semi Final Scenario ODI WC : पाकिस्तानी संघावर टीम इंडियाच्या हाता पाया पडण्याची वेळ; तीन सामन्यांत उतरला सर्व माज...

Shocking Crime in Sangli : सांगलीत नेमकं काय सुरू आहे?, तरुणीस जबदरस्तीने दुचाकीवर बसवून जंगलात नेलं अन्; तरूणाने नको ते केलं

SCROLL FOR NEXT