Supriya Sule
Supriya Sule 
पुणे

Supriya Sule: सुप्रिया सुळेंचा दिलदारपणा! रस्त्यात बंद पडलेल्या बस प्रवाशांची केली मदत, आपल्या वाहनातून दिली लिफ्ट

सकाळ डिजिटल टीम

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रीया सुळे यांच्या दिलदारपणाची झलक नुकतीच पुणे-सातारा महामार्गावर दिसून आली. रस्त्यात बंद पडलेल्या राज्य परिवहन सेवेच्या बसमधील काही महिला प्रवाशांना त्यांनी आपल्या कारमधून लिफ्ट दिली आणि त्यांना इच्छित स्थळी पोहोचवलं. त्यांच्या या कृतीचा व्हिडिओ समोर आला आहे. (NCP MP Supriya Sule was given lift to bus passengers who was stuck on Pune Satara Highway)

सुप्रीया सुळे यांनी आपल्या फेसबूक अकाऊंटवरुन या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच यावेळी लिहिलेल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं की, "आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर तालुक्याच्या दौऱ्यावर जात असताना वाटेत शिवशाही बस बिघाड झाल्यानं थांबल्याची दिसली. गाडी नादुरुस्त झाल्यानं प्रवासी पर्यायी वाहनाची वाट पाहत तिथंच उन्हांत थांबले होते. यामध्ये काही लहान मुलांचाही समावेश होता. उन्हाचा तडाखा जाणवत असल्यानं हे प्रवासी आणि लहान मुलांना होणारा त्रास कमी करण्यासाठी काही जणांना दुसऱ्या बसमधून खेड शिवापूरमधील टोल नाक्यावर सोडण्याची विनंती केली. तर काही प्रवाशांना माझ्यासोबत असणाऱ्या गाडीतून खेड शिवापूर टोलनाक्यापर्यंत आणले. याठिकाणी त्यांची तात्पुरती व्यवस्था केली" (Latest Marathi News)

प्रवाशांच्या चेहऱ्यावरील आनंद समाधान देणारा

यातील बरेच प्रवासी सांगली आणि मिरजला जाणारे होते. यावेळी माझ्या सुरक्षेसाठी असणारे पोलीस आणि माझे काही सहकारी यांना प्रवाशांची सोय करण्याबाबत सांगितलं. हे सर्वजण प्रवासी त्याच्या गावी जाणाऱ्या बसमध्ये पाठवेपर्यंत थांबतील असा विश्वास दिला. यावेळी प्रवाशांच्या चेहऱ्यावरील आनंद समाधान देणारा होता. तसेच प्रवाशांना टोलनाक्यापर्यंत आणण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल एसटी बसचे चालक एस. एस. कदम आणि वाहक आर. व्ही. सोनवणे यांचे आभार मानले.

एसटी महामंडळाला दिला सल्ला

दरम्यान, सुप्रीया सुळे यांनी एसटी महामंडळाला एक मोलाचा सल्ला देखील दिला. त्यांनी म्हटलं की, "एसटी महामंडळानं आपण बाहेर सोडत असणारी प्रत्येक गाडी तपासून पाठविली पाहिजे. महामंडळाच्या गाड्या अचानक नादुरुस्त होण्याचं प्रमाण आजकाल वाढलं असल्याचं प्रवासी सांगतात. राज्याच्या परीवहन मंत्र्यांनी याकडं वैयक्तिक लक्ष घालून प्रवाशांना नाहक त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे"

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT