पुणे

राष्टर्वादी

CD

PNE26W42967
मुंबई ः ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली.

राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत पक्षबांधणीसाठी बैठक
शरद पवार यांनी घेतला तालुकानिहाय आढावा
अहिल्यानगर, ता. १७ : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष बांधणीसाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी तालुका आणि जिल्हानिहाय आढावा घेतला जात आहे. मुंबईत राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार, पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, प्रदेश सरचिटणीस आमदार रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदेश कार्यालयात ही बैठक झाली.
जिल्ह्यातील विविध स्थानिक समस्या व विविध प्रश्नांबाबत माहिती जाणून घेऊन जनतेच्या प्रश्नांवर पक्षाची भूमिका स्पष्ट केली. त्यासाठी आवश्यक त्या सूचना व मार्गदर्शन करण्यात आले. अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेच्या निडणुकीबाबतही त्यांनी माहिती घेतली.
या बैठकीस जिल्हा निरीक्षक अंकुश काकडे, जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप वर्पे, दक्षिणचे जिल्हाध्यक्ष सीताराम काकडे, शहर कार्याध्यक्ष नामदेवराव पवार, अनिकेत कराळे, आदी उपस्थित होते.
पक्षाचे प्रदेश पदाधिकारी सरचिटणीस रवींद्र पवार, सरचिटणीस अदिती नलवडे, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष पंडित कांबळे, अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष अफजल फारुख, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, अल्पसंख्याक कार्याध्यक्ष वारिस खान, ओबीसी प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर, सेवादल प्रदेशाध्यक्ष गिरीश सामंत, समन्वयक सुहास उभे, विद्यार्थी माजी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, युवती प्रदेशाध्यक्ष अमृता काळदाते, मनाली भिलारे आदी उपस्थिती होते.
या बैठकीत अहिल्यानगर जिल्ह्यातील तालुकानिहाय संघटनात्मक कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. खासदार पवार व खासदार सुळे, प्रदेशाध्यक्ष शिंदे यांनी जिल्ह्यातील संघटनात्मक परिस्थिती जाणून घेत संवाद साधला.
आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका विचारात घेऊन पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी तालुका, शहर, गाव आणि बूथ पातळीपर्यंत संघटना अधिक सक्रिय करण्यासोबतच जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवून विरोधी पक्ष म्हणून सरकारच्या धोरणांवर जनतेच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्यावरही बैठकीत भर देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Record : ख्रिस गेलचा १७५ धावांचा विक्रम उद्ध्वस्त, Lhuan-Dre Pretorius ने रचला इतिहास; २८चेंडूंत १३८ धावा

बालीत सुट्टी एन्जॉय करणं पडलं महागात! नुसरत भरुचा हिचा भीषण अपघात, ऑक्सिजन सपोर्टवर मुंबईत आणलं, Video

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी जंतर-मंतरवर १० ऑक्टोबरला CJPचे आंदोलन

Ratnagiri News : देवरूखच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना नोटीस मोबाईल मेडिकल युनिट बंद; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Weather: ऑक्टोबर हीट'चा मुंबईला चटका, तापमानाचा पारा चाळिशीजवळ; पाहा IMDचा अंदाज

SCROLL FOR NEXT