ncp over rbi withdrawal 2000 note bjp pm modi karnataka election politics  
पुणे

RBI Withdrawal 2000 Note : राष्ट्रवादीने घेतली दोन हजाराची नोटची शोकसभा

“यु टर्न सरकार… मोदी सरकार’’, “नोटबंदी कशाला कसबा कर्नाटकच्या बदला घ्यायला

सकाळ वृत्तसेवा

पुणे : रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांची नोट चलनातून बाहेर काढल्याने यातून मोदी सरकारचे अपयश समोर येत असून, अर्थव्यवस्थेचे नुकसान करत असल्याचा आरोप करत आज राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यातील रिझर्व्ह बँकेच्या कृषी बँकिंग महाविद्यालयसमोर दोन हजार रुपयाच्या नोटेची प्रतिकात्मक शोकसभा आयोजित करून आंदोलन केले.

“परत द्या परत द्या , नोटेतील चीप परत द्या’’, “चांगभल चांगभल नोटबंदीच्या नावाने चांगभल’’, “यु टर्न सरकार… मोदी सरकार’’, “नोटबंदी कशाला कसबा कर्नाटकच्या बदला घ्यायला अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

शहराध्यक्ष प्रशांत जगताप , प्रवक्ते प्रदीप देशमुख , बाळासाहेब बोडके , अजिंक्य पालकर , मृणालिनी वाणी , सुषमा सातपुते , महेश हंडे , शालिनी जगताप , कुलदीप शर्मा , शुभम माताळे आदी यावेळी उपस्थित होते.

"मोदी सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी काळा पैसा नष्ट करण्यासाठी नोटबंदी करुण पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बंद केल्या होत्या. त्याचवेळी दोन हजार रुपयांची नोट चलनात आणली व आज सहा वर्षांनंतर ती नोट चलनातून बाद केली. यावरून तेव्हा नोटबंदीचे समर्थन करणारे समर्थक तोंडावर पाडले आहे’’, अशी टीका प्रशांत जगताप यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Marathi Language Row : लोकांना मराठी सक्तीचे धडे देणारे सरकार मंत्रालयातच 'नापास'; प्रवेशद्वारावरील 'तो' फलक पाहून कपाळावर हात माराल!

सरकारी जमिनींवर आता शेती करता येणार! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; पण फक्त एकाच अटीवर, कोणती?

SRH vs RR PL 2026: १६ चेंडूंत फिफ्टी! वैभव सूर्यवंशीने मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड! ठरला आयपीएल इतिहासातील Baby Boss

Maharashtra SET Exam : महाराष्ट्र-गोव्यातील सहाय्यक प्राध्यापक भरतीसाठी SET परीक्षा २६ जुलैला; अर्ज प्रक्रिया २ जूनपासून ऑनलाइन सुरू

TET Exam: टीईटी परीक्षेसाठी कमी संख्या असलेल्या माध्यमाच्या उमेदवारांची परीक्षा केंद्र निश्चित

SCROLL FOR NEXT