Vidya Chavan Sakal
पुणे

NCP Party : राष्ट्रवादीतील प्रमुख सात महिला पदाधिकारी बडतर्फ

राष्ट्रवादीतील फूटीनंतर आता ज्येष्ठ नेते शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील पक्षीय स्तरावर कडक भूमिका घेण्याचे धोरण अवलंबिल्याचे चित्र दिसत आहे.

- मिलिंद संगई

बारामती - राष्ट्रवादीतील फूटीनंतर आता ज्येष्ठ नेते शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील पक्षीय स्तरावर कडक भूमिका घेण्याचे धोरण अवलंबिल्याचे चित्र दिसत आहे. या फूटीनंतर राज्यातील काही महिला पदाधिका-यांची महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी हकालपट्टी केली आहे.

उमा मुंडे (रायगड), दीपाली पांढरे (सोलापूर), कविता आल्हाट (पिंपरी), वैशाली नागवडे (पुणे), लोचन शिवले (पुणे), शीतल हगवणे (पिंपरी चिंचवड), प्रेरणा बलकवडे (नाशिक) यांना महिला संघटनेतील पदावरुन तातडीने बडतर्फ करत असल्याचे पत्र विद्या चव्हाण यांनी जारी केले आहे.

विद्यमान सरकारमध्ये सामील होणा-या व मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या आमदारांना पाठिंबा दिल्याचे निदर्शनासा आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. हे कृत्य पक्षाच्या ध्येय धोरणांशी विसंगत विरोधी असल्याने ही कारवाई करत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

या महिला पदाधिका-यांनी या पुढील काळात राष्ट्रवादी पक्षाचे नाव, चिन्ह व ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा फोटो व नावाचा वापर करु नये, अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही या पत्रात संबंधित महिला पदाधिका-यांना देण्यात आला आहे.

या मध्ये सर्वच महिला पदाधिकारी राष्ट्रवादीच्या महत्वाच्या पदांवर कार्यरत होत्या. अजित पवार यांना पाठिंबा दिल्यानंतर त्यांना पक्षातून बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पदाधिका-यांपर्यंत त्यांच्या बडतर्फीची पत्रे पोहोचविण्यात आली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: पहिल्यांदा IPS, पण स्वप्न IASचं! किराणा दुकानदाराच्या मुलीने दुसऱ्या प्रयत्नात कसं मिळवलं यश?

Maharashtra Budget 2026 : बळिराजा लाडका! दोन लाखांपर्यंतचे पीक कर्ज माफ, बहिणींना ओवाळणी कायम

Donald Trump Fuel Price Warning : ‘इंधन दरवाढीची फिकीर नाही’ डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट जगाला दिला इशारा

Latest Marathi News Live Update : कामठीत मोकाट कुत्र्यांचा कहर, एका दिवसात १४ नागरिकांना चावा

Maharashtra Heatwave Alert : राज्यात सूर्याचा प्रकोप! अमरावतीने ओलांडली चाळीशी; पुढील 24 तास तुमच्यासाठी का आहेत महत्त्वाचे?

SCROLL FOR NEXT