Sharad Pawar News Sakal
पुणे

अजित पवार गटाच्या गौप्यस्फोटाबाबत शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, चर्चा झाली होती...

कार्तिक पुजारी

पुणे- राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी आज पुण्यामध्ये आमदार-खासदारांची बैठक घेतली होती. बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी एकनाथ खडसे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड इत्यादी नेते उपस्थित होते. अजित पवार गटाने केलेल्या गौप्यस्फोटाबाबत शरद पवारांनी यावेळी भाष्य केलं.

पक्षाचा मी अध्यक्ष होतो. प्रत्येकाला माझ्याशी सुसंवाद साधण्याचा पूर्ण अधिकार होता. ज्या मागण्या केल्या, त्याबाबत चर्चा झाली नाही असं मी म्हणत नाही. चर्चा झाली होती. पण, ते जे विचार करत होते, ते आमच्या विचाराशी सुसंगत नव्हते. जनतेला आम्ही जी आश्वासनं दिली होती त्या भूमिकेशी ते विसंगत होतं. आम्ही जनतेला भाजपसोबत जाण्यासाठी मतदान मागितलं नव्हतं, असं पवार म्हणाले.

विधानसभेमध्ये आम्ही जी मत मागितली ती भाजपसोबत जाण्यासाठी मागितली नव्हती. ती विशिष्ट कार्यक्रमासाठी होती. भाजपच्या विरोधात आमची भूमिका होती. जे लोकं आमचे निवडून आले त्यांना मतदारांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्यांच्यासोबत गेलो असतो तर जनतेची दिशाभूल झाली असती. त्यांचे विचार जाहिरनाम्याशी विसंगत होते. त्यामुळे भाजपसोबत न जाण्याची भूमिका माझ्यासह अनेकांनी घेतली, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं.

गाफील ठेवल्याबाबतच्या वक्तव्याबाबतही शरद पवारांनी भाष्य केलं. मी अध्यक्ष होतो आणि निर्णय घेण्यासाठी मी सक्षम आहे. कोण्या नेत्याला विचारुन मी निर्णय घेण्याचा प्रश्नच येत नाही. मी राजीनामा दिला आणि तो परत घ्यायचा असेल तर मला परांजपे किंवा आव्हाड यांची परवानगी घ्यायच गरज नाही. निर्णय घेण्याची माझी कुवत आहे, असं पवार म्हणाले.

शिवसेनेसोबत जाण्याची भूमिका वेगळी होती. आज आमची भूमिका भाजपसोबत न जाण्याची होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र बसून शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. पण, या लोकांनी थेट सत्तेत जाऊन मंत्रिपदाची शपथ घेतली. हा यातील फरक आहे, असं पवार म्हणाले.

सत्य काय आहे हे महत्त्वाचं आहे. अजित पवार खोटं बोलत आहेत. काही गोष्टी मला पहिल्यांदाच कळाल्या आहेत. लोक निर्णय घेतील तो स्वीकारायचा असतो. कोणी काही स्टेटमेंट करेल ते मी का स्वीकारावं? कोणी काय भूमिका घ्यावी हा त्यांचा अधिकार आहे. पण, त्यांनी हा निर्णय निवडणुकीच्या आधी घ्यायचा होता, असा निशाणा पवारांनी साधला.

शरद पवारांनी अवकाळी स्थितीबाबत भाष्य केलं. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सरकारने तातडीने शेतकऱ्यांना मदत करण्याची आवश्यकता आहे. सध्याचा पंचनाम्याचा वेग कमी आहे. (Latest Marathi New)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष; प्रफुल्ल पटेल यांची घोषणा

T20 WC, IND vs ZIM: भारतीय संघ २ बदलांसह उतरणार; झिम्बाब्वेविरुद्धच्या Playing XI मध्ये स्टार खेळाडू परतले, कोणाचा पत्ता झाला कट ?

Indian Railways Digital Initiative : भारतीय रेल्वेने उचललं मोठं डिजिटल पाऊल!, ‘रेल टेक पोर्टल’ अन् ‘ई-आरसीटी’ प्रणाली सुरू

Latest Marathi News Live Update : वाढत्या तापमानाचा धुळ्यातील जलसाठ्यांवर परिणाम; पाणी पातळीत घट

India GDP: महत्त्वाची बातमी! १० वर्षांचा नियम संपला; देशाच्या महसूल गणनेत मोठा बदल, नवे सूत्र कधीपासून लागू होणार?

SCROLL FOR NEXT